शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

अखिलेश यांनी प्रचारात आणले योगी आदित्यनाथांचे 'डुप्लिकेट', काढतील का भाजपाची विकेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 5:45 PM

अखिलेश यांच्या साथीला योगी आदित्यनाथांचे डुप्लिकेट

लखनऊ: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत दिसणारी एक व्यक्ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी ही व्यक्ती सध्या अखिलेश यांच्या सावलीसारखी त्यांच्यासोबत असते. कालच अखिलेश यांनी चार्टर्ड प्लेनमधला एक फोटो ट्विट केला. त्यातही योगींप्रमाणे दिसणारी ती व्यक्ती होती. काल अखिलेश यादव यांनी फोटो ट्विट करताच योगी आदित्यनाथ चार्टर्ड विमानात अखिलेश यांच्यासोबत कसे, असा सवाल अनेकांच्या मनात आला. अखिलेश यांचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला. 'आम्ही मुख्यमंत्री निवासस्थान सोडताच त्यांनी ते गंगेच्या पाण्यानं धुतलं. तेव्हाच आम्ही ठरवलं होतं, त्यांना पुरी खायला घालू,' असं अखिलेश यांनी ट्विटमध्ये म्हटल्यानं चर्चेला आणखी उधाण आलं. मात्र त्यानंतर ते योगी नसून त्यांचे डुप्लिकेट असल्याची माहिती समोर आली. योगी आदित्यनाथांप्रमाणे दिसणाऱ्या, अखिलेश यांच्यासोबत असणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव सुरेश ठाकूर आहे. ते लखनऊच्या केंट भागात राहतात. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. ठाकूर योगींप्रमाणेच भगवं वस्त्र परिधान करतात, कानात बाळी घालतात. त्यांची वेशभूषा पूर्णपणे आदित्यनाथांसारखी आहे. माझा चेहरा योगी आदित्यनाथांसारखा दिसतो, त्याला मी काय करणार?, असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला. 'मला पाहून लोकांना आनंद वाटतो, हे पाहून छान वाटतं. मी कायम अशाच प्रकारची वस्त्रं परिधान करतो. भगव्या रंगाला लोकांनी हिंसेचं प्रतीक केलं आहे. मात्र मी अहिंसेचा पुरस्कार करतो. कारण मी बौद्ध धर्माचा अनुयायी आहे,' असं ठाकूर यांनी म्हटलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा