नाराज अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 08:01 AM2019-03-24T08:01:11+5:302019-03-24T08:11:35+5:30

औरंगाबादमधून उमेदवारी न मिळाल्यानं सत्तार नाराज

lok sabha election 2019 congress leader abdul sattar meets cm devendra fadnavis | नाराज अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?

नाराज अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?

googlenewsNext

मुंबई: काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काँग्रेसनंऔरंगाबादमधून विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज आहेत. त्यांनी झांबड यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात औरंगाबादसह 5 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड केलं. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र तिकीट न मिळाल्यानं त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुसाठी मागील अनेक महिन्यांपासून मी तयारी करत होतो. काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावोगावी फिरलो. एल्गार यात्रा काढली. कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. मात्र इतकं करुनही पक्षानं मला डावललं. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी काल स्पष्ट केलं. शिवसेनेनं औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. खैरे यांच्याविरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसमध्ये आणून तिकीट द्यावं, यासाठी सत्तार यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आग्रह धरला होता. मात्र अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. यानंतर सत्तार यांनी स्वत: बंड करत लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
 


 

Web Title: lok sabha election 2019 congress leader abdul sattar meets cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.