शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka CM: मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा; येडीयुराप्पांमुळे भाजपा नेतृत्वासमोर मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 22:02 IST

Karnataka Politics: येडीयुराप्पा यांनी राज्यात येताच आमदारांची आणि मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. 26 जुलैला ही बैठक होणार आहे. त्या आधी त्यांनी दिल्लीत जात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंडचा मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता कर्नाटकातही (Karnatak CM) मोठा बदल करण्याची भाजपाने तयारी केली आहे. मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा (bs yediyurappa) यांची खुर्ची धोक्यात आली असून गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बंडाळीमुळे भाजपाने दुसऱ्या नेत्याला नेतृत्व देण्याचा निर्णय पक्का केला आहे. काँग्रेस-निजदला सत्तेवरून खाली खेचत येडीयुराप्पांनी भाजपाची सत्ता स्थापन केली होती. परंतू त्यांची एकाधिकारशाही भाजपाच्या अन्य नेत्यांना रुचली नसल्याने काही काळातच त्यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त होऊ लागली होती. (BJP will change karnataka CM soon; this names in que to Next CM.)

भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने येडीयुराप्पांना आज दिल्लीला पाचारण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेतल्यावर आपल्या खुर्चीला धोका नसल्याचे वक्तव्य येडीयुराप्पा यांनी केले आहे. परंतू, भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु झाल्या असून राज्यात लिंगायत समाजाचे वर्चस्व असल्याने त्याच समाजाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे. (bs yediyurappa met Amit Shah in Delhi.)

येडीयुराप्पा यांनी 2012 मध्ये भाजपा सोडून नवा पक्ष स्थापन केला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या केजेपी पक्षाला एकूण 9.8 टक्के मते मिळाली होती. तसेच 6 आमदार निवडून आले होते. त्यात येडीयुराप्पा, शोभा करंदलाजे हे होते. भाजपालाही मोठी झळ बसली होती. यानंतर येडीयुराप्पा यांनी भाजपात प्रवेश करत लोकसभा लढविली होती. लोकसभेला जिंकले व राज्याच्या निवडणुकीवेळी त्यांना पुन्हा राज्यात पाठविण्यात आले होते. जदयू-काँग्रेसचे सरकार पाडल्यानंतर येडीयुराप्पांचा पुत्र बी .एस. विजयेंद्र यांनी सरकारमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. यामुळे भाजपाच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. प्रकरण बंडापर्यंत पोहोचले होते. यामुळे मोठे राज्य हातचे जाऊ नये म्हणून भाजपा मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता आहे. 

येडीयुराप्पांच्या तीन अटी...यासाठी लिंगायत समाजाच्याच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यासाठी येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी आहेत. 

चार नावे चर्चेत... (Who is next CM of Karnataka)यामुळे सध्या चार नावांची चर्चा आहे. 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत आहेत. यतनाल यांनीच येडीयुराप्पांना हटविण्याची मागणी केली होती. आता भाजपा नेतृत्व येडीयुराप्पांचे लाड पुरविते की यतनाल यांना मुख्यमंत्री करते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाBJPभाजपाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटक