"Jitendra Awhad seems to have forgotten that Pawar was defeated in Delhi"; BJP MLA Atul Bhatkhalkar | "दिल्लीत पवारांना हाणले होतं ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत"; भाजपा आमदार

"दिल्लीत पवारांना हाणले होतं ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत"; भाजपा आमदार

ठळक मुद्देदिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले त्याचेही समर्थन करा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा मंत्री जितेंद्र आव्हाडांना टोला जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं माजी नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचं समर्थन

मुंबई  - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कार्टून फॉरवर्ड केल्याने एका निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली. या मारहाणीत ६५ वर्षीय मदन शर्मा यांना गंभीर दुखापतही झाली. या घटनेवरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं. यानंतर संजय राऊत यांनी या प्रकारावर भाष्य केले.

या संपूर्ण घडामोडीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला काळाची गरज असं कॅप्शन दिल्याने नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसने केलंय का? असा प्रश्न निर्माण झाला. यावरुन आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले की, मंत्रीपदावर असताना लोकांचे अपहरण करून मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड  भुरट्या गुंडगिरीचे समर्थन करणारच. मागे दिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले होते ते आव्हाड विसरलेले दिसतायत. त्याचेही समर्थन करा आता अशा शब्दात त्यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे.

व्हिडीओत काय होतं?

या व्हिडीओत बाळासाहेब म्हणतात की, कारण नसताना कोणी कानफाडात मारली तर छान मारली, आणखी जोरात मारायला हवी होती, इतका बुळचटपणा बरा नाही, त्याचा फाटकन आवाज आल्यानंतर ताडकन् आपला आवाज आला पाहिजे तो शिवसैनिक...नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नको, कानफाडात मारण्यासाठी तो तयार ठेवा असं शिवसेनाप्रमुख कार्यकर्त्यांना सांगताना २६ सेकंदचा व्हिडीओ आहे. त्यामुळे माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाणीचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून समर्थन केलं जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र वाद निर्माण झाल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाडांनी हे ट्विट डिलीट केले.  

देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरेंना हे गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं. लोकांना अटक करणं आणि दहा मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे. महाराष्ट्रात यापूर्वी आपण अशा प्रकारचं वातावरण कधीही पाहिलं नाही अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

"राज्यात माणूसकी नावाची गोष्टच उरलेली नाही, राष्ट्रपती राजवट लागू करा"

नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. त्यामुळे काही शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली. शर्मा यांची कन्या शीला यांनी वडिलांवर झालेल्या हल्ल्यासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचं म्हटलं. एक कार्टून फॉरवर्ड केल्याने माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या. शिवसेनेच्या काही लोकांनी त्यांच्यावर हल्लाही केला असं म्हटलं आहे.

शीला यांनी पोलीस घरी आले आणि त्यांनी वडिलांना सोबत येण्यासाठी जबरदस्ती केली. आम्ही हल्ल्याप्रकरणी एफआरआय नोंदवला आहे. राज्यात माणूसकी नावाची गोष्टच उरलेली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे असं देखील शीला यांनी म्हटलं आहे. भाजपाचे कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करुन शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शिवसेनेचे कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 65 वर्षाच्या मदन शर्मा नावाचे माजी नौदल अधिकारी कांदिवली पूर्व येथे ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राहतात.

काळाची गरज...! नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण; राष्ट्रवादीकडून समर्थन?

कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर ठाकरेंनी राजीनामा द्या

नौदलाच्या निवृत्त अधिकारी मदन शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची व्यथा मांडली. 'मी जखमी आहे. तणावात आहे. जे घडलं ते अतिशय दु:खद आहे. मला उद्धव ठाकरेंना एक गोष्ट अतिशय स्पष्ट शब्दांत सांगायची आहे. तुम्हाला कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल, तर राजीनामा द्या. ही जबाबदारी कोणाला द्यायची ते लोकांना ठरवू दे,असं शर्मा म्हणाले. 'अशी घटना घडू नये. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं देशाची माफी मागायला हवी,' अशी मागणी त्यांनी केली होती.

संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा

नौदलातील माजी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत सिंह यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं. सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी संवादही साधला आहे. 'माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवरील अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असं राजनाथ सिंह म्हणाले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

“कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला

"बाळासाहेबांचा ‘ठाकरे ब्रँड’ सांभाळण्यास राजसाहेब समर्थ"; शिवसेनेच्या सादेला मनसेची चपराक

राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...

“मुंबई असो की महाराष्ट्र, एकच ब्रँड; छत्रपती शिवाजी महाराज”; नितेश राणेंनी संजय राऊतांना फटकारलं

CNG पंपाचे मालक होण्याची सुवर्णसंधी! सरकार १० हजार परवाने देणार; आजच करा अर्ज!

Web Title: "Jitendra Awhad seems to have forgotten that Pawar was defeated in Delhi"; BJP MLA Atul Bhatkhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.