काळाची गरज...! नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण; राष्ट्रवादीकडून समर्थन?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 08:01 AM2020-09-13T08:01:07+5:302020-09-13T08:07:30+5:30

महाराष्ट्रात यापूर्वी आपण अशा प्रकारचं वातावरण कधीही पाहिलं नाही अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

Former naval officer beaten by Shiv Sainiks; Support from the NCP Jitendra Awhad? | काळाची गरज...! नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण; राष्ट्रवादीकडून समर्थन?

काळाची गरज...! नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण; राष्ट्रवादीकडून समर्थन?

Next
ठळक मुद्देमाजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून बेदम मारहाणराष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं काळाची गरज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाचा फटका नौदलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला बसला आहे. व्हॉट्सअपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक कार्टून ग्रुपमध्ये फॉरवर्ड केल्याने ८ ते १० शिवसैनिकांनी मिळून ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला बेदम मारलं. या मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर  ६ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शिवसैनिकांचा जामिनावर सुटका करण्यात आली.

माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्यामुळे विरोधी पक्ष भाजपाच्या हाती आयता मुद्दा सापडला. या प्रकरणावरुन भाजपाने महाविकास आघाडी सरकार विशेषत: शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपा आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे तर कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर सोशल मीडियात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही हा व्हिडीओ शेअर करत काळाची गरज असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओत बाळासाहेब म्हणतात की, कारण नसताना कोणी कानफाडात मारली तर छान मारली, आणखी जोरात मारायला हवी होती, इतका बुळचटपणा बरा नाही, त्याचा फाटकन आवाज आल्यानंतर ताडकन् आपला आवाज आला पाहिजे तो शिवसैनिक...नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नको, कानफाडात मारण्यासाठी तो तयार ठेवा असं शिवसेनाप्रमुख कार्यकर्त्यांना सांगताना २६ सेकंदचा व्हिडीओ आहे. त्यामुळे माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाणीचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून समर्थन केलं जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरेंना हे गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं. लोकांना अटक करणं आणि दहा मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे. महाराष्ट्रात यापूर्वी आपण अशा प्रकारचं वातावरण कधीही पाहिलं नाही अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

"राज्यात माणूसकी नावाची गोष्टच उरलेली नाही, राष्ट्रपती राजवट लागू करा"

नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. त्यामुळे काही शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली. शर्मा यांची कन्या शीला यांनी वडिलांवर झालेल्या हल्ल्यासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचं म्हटलं. एक कार्टून फॉरवर्ड केल्याने माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या. शिवसेनेच्या काही लोकांनी त्यांच्यावर हल्लाही केला असं म्हटलं आहे.

शीला यांनी पोलीस घरी आले आणि त्यांनी वडिलांना सोबत येण्यासाठी जबरदस्ती केली. आम्ही हल्ल्याप्रकरणी एफआरआय नोंदवला आहे. राज्यात माणूसकी नावाची गोष्टच उरलेली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे असं देखील शीला यांनी म्हटलं आहे. भाजपाचे कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करुन शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शिवसेनेचे कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 65 वर्षाच्या मदन शर्मा नावाचे माजी नौदल अधिकारी कांदिवली पूर्व येथे ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राहतात.

Web Title: Former naval officer beaten by Shiv Sainiks; Support from the NCP Jitendra Awhad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.