"काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा करावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 02:23 PM2021-04-13T14:23:41+5:302021-04-13T14:56:35+5:30

Jammu Kashmir Mehbooba Mufti And Narendra Modi : श्रीनगरमधील पक्षाच्या कार्यालयात  पक्ष विशेष सदस्य मोहीमला सुरुवात करताना मेहबूबा मुफ्ती यांनी असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

jammu kashmir mehbooba mufti says pm modi to go to pakistan and talk for solution of kashmir issue | "काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा करावी"

"काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा करावी"

Next

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti ) यांनी केंद्र सरकारला काश्मीर मुद्द्यावर सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा केली पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच दोन्ही देशांनी शस्त्र सोडून काश्मीरमध्ये शांतता कायम राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. केंद्र सरकारने काश्मीर मुद्द्यावर तातडीने कुठलंही पाऊल उचललं नाही तर परिस्थिती आणखी बिघडेल असं देखील मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 

श्रीनगरमधील पक्षाच्या कार्यालयात  पक्ष विशेष सदस्य मोहीमला सुरुवात करताना मेहबूबा मुफ्ती यांनी असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. "काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी केल्याने भाजपाचा संताप का होतो? मग काय ही मागणी आम्ही पाकिस्तानकडे करावी का? स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीर हे भारतातला मिळाले नाही ना पाकिस्तानला" असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 

"भाजपाकडे संख्याबळ आहे. पण विरोध करणाऱ्यांना चिरडून टाकणार असा त्याचा अर्थ होत नाही. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा चीनने नव्हता दिला. यामुळे काश्मीरची जनता गप्प बसणार नाही. जम्मू-काश्मीर आणि लडाख नागरिकांमध्ये संताप आहे" असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकार आपल्याविरोधात प्रकरणं शोधत आहे. जेणे करून आपल्याला त्रास देता येईल. यामुळे त्यांनी आपल्या आईला समन्स पाठवलं. पण आपण घाबरणार नाही. सरकारने हवं तर भावाला आणि मुलीला समन्स पाठवावं, असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?", यशवंत सिन्हांचा हल्लाबोल

यशवंत सिन्हा यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?" असं टीकास्त्र सोडलं आहे. सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत निशाणा साधला आहे. "बंगालच्या निवडणुका हरल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आपल्या पदाचा राजीनामा देणार का?" असा प्रश्न यशवंत सिन्हा यांनी विचारला आहे. तसेच "या निवडणुकीत ते स्वतः ज्याप्रकारे प्रचारात उतरलेत…त्यानंतरही जर पराभव झाला तर स्वाभिमान राखून त्यांनी किमान राजीनामा द्यायला हवा…पण प्रतिष्ठा नसलेल्या लोकांकडून मी जरा जास्तच अपेक्षा ठेवतोय हे मला माहीत आहे" असं देखील यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.

Web Title: jammu kashmir mehbooba mufti says pm modi to go to pakistan and talk for solution of kashmir issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.