शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

बसपाच्या तोंडी ‘जय लोहिया’, सपाच्या मुखात ‘जय कांशीराम’!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 3:58 AM

मायावती, अखिलेश यादव आघाडी; उत्तर प्रदेशातील राजकारण बदलले

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात आघाडी केलेल्या सपा व बसपाचे नेते जिंकण्याच्या ईर्षेने प्रचाराला लागले आहेत. बसपाचे नेते प्रचारसभांत ‘जय भीम, जय भारत’ याबरोबरच ‘जय लोहिया, जय समाजवाद’ या सपाच्या घोषणाही देऊ लागले आहेत, तर सपाचे नेते राममनोहर लोहिया यांना आदर्श मानत असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मायावती, कांशीराम यांचाही जयजयकार करू लागले आहेत.सभेच्या ठिकाणी सपा, बसपाचे झेंडे एकत्रपणे दिमाखाने फडकत असतात. मात्र तरीही एक प्रश्न आवर्जून विचारला जातो की, सपाकडे असलेली यादवांची तसेच बसपाकडे असलेली जाटव यांची मते परस्परांच्या उमेदवारांना मिळवून देण्यात त्यांना यश येईल का? हे दोन्ही पक्ष सुमारे दोन दशके एकमेकांचे कट्टर राजकीय हाडवैरी होते. आग्रा येथील बसपाचे नेते रवींद्र पारस वाल्मिकी यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांचे या वेळी खऱ्या अर्थाने मनोमिलन झाले आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी १९९५ साली लखनऊच्या सरकारी विश्रामधामात मायावतींवर हल्ला केला होता. त्या घटनेपासून दोन्ही पक्षांत वितुष्ट निर्माण झाले होते. मात्र आता हा सारा इतिहास झाला.जनतेच्या दबावामुळेच सपा, बसपाला लोकसभा निवडणुकांत आघाडी करावी लागली आहे. उत्तर प्रदेशात दोन्ही पक्षांच्या यादव व जाटव समुदायातील कार्यकर्त्यांमध्ये एकी होणार का यावर त्यांचे यश अपयश अवलंबून आहे. इटावा येथील कोठी बिचपुरा गावातील जाटव समाजातील शेतकरी रामदास म्हणाले की, सपाबरोबर आघाडी करून मायावतींनी दलितांचा अपेक्षाभंग केला आहे.यादवांची मतेही बसपालासराय इसार गावातील शिशुपाल सिंह यादव यांनी सांगितले की, सपाची यादवांची मते बसपाच्या उमेदवारांना मिळण्यात काही अडचणी येतील असे वाटत नाही. मायावतींविषयी आमच्या मनात आकस नाही. योगी यांच्यापेक्षा मायावती-सपाचे सरकार केव्हाही चांगलेच असेल.सपाचे सरकार असताना गुंडांना मोकळे रान होते. लोकसभा निवडणुकांनंतर गुंडांचे राज्य पुन्हा प्रस्थापित होणार असेल तर मग दलितांना कोण वाली उरणार? अर्थात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मात्र सर्व जाती आमच्याबरोबर असल्याचा दावा करीत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा