शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

हिंसेचा मार्ग सोडून निवडणूक लढवणाऱ्या माजी नक्षली नेत्याने केली नक्षलवाद्यांची पोलखोल, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 1:03 PM

West Bengal Assembly Elections 2021: देशातील काही राज्यांत सक्रिय असलेला नक्षलवाद (Naxalites ) हा देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. मात्र देशातील लोकशाही व्यवस्थेला नेहमी विरोध करत असलेले नक्षलवादी मोठ्या संख्येने मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत. 

कोलकाता - देशातील काही राज्यांत सक्रिय असलेला नक्षलवाद (Naxalites ) हा देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. मात्र देशातील लोकशाही व्यवस्थेला नेहमी विरोध करत असलेले नक्षलवादी मोठ्या संख्येने मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत.  (West Bengal Assembly Elections 2021)अशा परिस्थिती पूर्वाश्रमीचे नक्षलवादी नेते बिनॉय कुमार यांनी नक्षलवाद आणि नक्षलवादी यांची पोलखोल करणारे विधान केले आहे. बिनॉय कुमार (binoy kumar) पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत उत्तर दिनाजापूरमधील रायगंज येथील करनदीघी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. (Former Naxalite leader who abandoned the path of violence and contested the elections, slammed the Naxalites )

बिनॉय कुमार म्हणाले की, निवडणुकीचा बहिष्कार करणारे नक्षलवादी हे खोटारडे आणि भांडवलदारांचे नोकर आहेत. हे सर्वजन कमिशन घेऊन स्वत:चे खिसे भरत आहेत, नवभारत टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत बिनॉय यांनी हे विधान केले आहे. 

 नक्षलवादी हल्ल्याबाबत बिनॉय म्हणाले की, जे नक्षलवादी आज लोकांना मारत आहेत, ते हा विकार करत नाही की, हे सैनिकसुद्धा आमच्या कुटुंबातून आम्ही तयार केले आहेत. तेसुद्धा भारतीय नागरिक आहेत आणि भारताच्या झेंड्याखाली काम करतात. तरीही नक्षलवादी आपल्याच देशाच्या नागरिकांना का मारत आहेत. हा सर्व भांडवलदारांचा खेळ आहे.  अर्बन नक्षलवादाबाबत बिनॉय म्हणाले की, हे लोक नक्षलवादी क्रांती समजून घेत नाहीत. खरंतर हे नक्षलवादीच नाही आहेत. या लोकांना स्थानिक प्रशासन राज्य सरकार आणि राजकीय पक्षांकडून कंट्रोल केले जाते. आता जनतेने मला संधी दिली तर मी सर्वात आधी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे काम करेन. एवढी वर्षे झाल्यानंतरही लोकांच्या या मुलभूत गरजांची पूर्तता झालेली नाही.  मूळचे कर्णजोरा, कालीबारी येथील रहिवासी असलेले बिनॉय यांच्या वडिलोपार्जित संपत्तीची किंमत ६५० कोटी ८२ लाख ५७ हजार रुपये आहे. माहितीनुसार त्यांच्याजवळ १०० एकरांहून अधिक जमीन, रायगंज, माल्दा, जलपैगुडी, हरियाणा, वाराणसीसह अनेक ठिकाणी १४ निवासस्थाने आहेत. असे असले तरी बिनॉय हे भाड्याच्या घरात वास्तव्य करतात. बिनॉय यांनी २०१८ मघ्या रायगंज जिल्हा परिषद आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१naxaliteनक्षलवादीIndiaभारत