"मुंबईसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवा"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 07:32 AM2020-09-07T07:32:32+5:302020-09-07T07:43:58+5:30

मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तिविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा. त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा.

"Forget the partisanship and raise your voice against the stranger who insulted the martyrs who sacrificed for Mumbai." - Saamana | "मुंबईसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवा"

"मुंबईसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवा"

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आहे. तितकाच तो भाजपाचाही असायला हवामहाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अवमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतातमुंबई पोलीस माफिया आहेत, असे विधान करणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनातही उमटण्याची चिन्हे आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज सामनामधील अग्रलेखामधून कंगनाविरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तिविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा. त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आहे. तितकाच तो भाजपाचाही असायला हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अवमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात. मुंबईत खाऊन पिऊन तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारुच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही. आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणाऱ्या त्या मेंटल महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे, हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलिस आयुक्त आणि संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे, असे आवाहनही सामनामधून करण्यात आले.

मुंबई पोलीस माफिया आहेत, असे विधान करणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, उत्तर प्रदेशातील मोस्ट वाँटेड आरोपी आशू यास मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याआधी कानपुरात पोलिसांची हत्या करून मुंबईत घुसलेल्या विकास दुबेच्या साथीदारांनाही मुंबई पोलिसांनीच बेड्या ठोकल्या. मुंबई शहर हे देशातील गुन्हेगारांचे डम्पिंग ग्राऊंड होत असेल. तर त्यास ती ती राज्ये जबाबदार आहेत. हे थांबवायचे अशेल तर मुळानांच हात घालावा लागेल. विधिमंडळात अशा अनेक प्रश्नांना न्यायप्रिय आमदारांनी वाचा फोडली तरी पुरे, अशी अपेक्षाही या अग्रलेखामधून व्यक्त करण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

मुंबईत येतेयकोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवाकंगनाचे खुले आव्हान

"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत ​​आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.

कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशारा

कंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला होता.

कंगनाला मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतवर जोरदार टीका केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत राहाणे सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते.

अमृता फडणवीस यांचा शिवसेनेला टोला

'आपण एखाद्याच्या मताशी सहमत असू शकत नाही. मात्र तरीही आपण लोकशाहीने दिलेल्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे हे काही योग्य नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृताने कंगना राणौत हिची पाठराखण केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

 ५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक

Web Title: "Forget the partisanship and raise your voice against the stranger who insulted the martyrs who sacrificed for Mumbai." - Saamana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.