For the first time, Sanjay Raut reacted to the meeting with Devendra Fadnavis, saying .... | देवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....

ठळक मुद्देगुप्त बैठक म्हणायला आम्ही काय बंकरमध्ये भेटलो होतो कादेवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये गोपनीय असे काय होतेया भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल झालेल्या गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकमेकांवर घणाघाती टीका करणारे दोन नेते अचानक गुप्तपणे भेटल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, फडणवीसांसोबतच्या या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये गोपनीय असे काय होते. गुप्त बैठक म्हणायला आम्ही काय बंकरमध्ये भेटलो होतो का, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

फडणवीस आणि संजय राऊत या नेत्यांमध्ये काल झालेल्या भेटीनंतर सुरू झालेल्या भेटीनंतर सुरू झालेल्या राजकीय तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, आमच्या भेटीमध्ये गोपनीय असे काही नव्हते. गोपनीय भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये तर भेटलेलो नाही. या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली. बाकी गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं, असा चिमटा राऊत यांनी काढला.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना न भेटालयला आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात पण वैयक्तिक वाद होत नाही. सत्ताधारी विरोधक भेटतच असतात. भाजपासोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले नेते मानतो, असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात झाली होती २ तास गुप्त बैठक

 सांताक्रुझच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये काल दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली होती. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नव्हता. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शायरी ट्विट केली होती, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए...अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है" त्यामुळे संजय राऊत यांना नेमका कोणाबाबत हा संदेश द्यायचा आहे या प्रश्न आहे. मात्र आजच्या बैठकीने हे संकेत दिलेत का अशीही चर्चा आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

English summary :
For the first time, Sanjay Raut reacted to the meeting with Devendra Fadnavis, saying What was confidential in the meeting with Devendra Fadnavis?

Web Title: For the first time, Sanjay Raut reacted to the meeting with Devendra Fadnavis, saying ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.