“काँग्रेस कार्यकर्तेही भाजपा नेत्याची कॉलर धरू शकतात, तेवढी ताकद आहे, पण...”

By प्रविण मरगळे | Published: October 1, 2020 10:05 PM2020-10-01T22:05:04+5:302020-10-01T22:07:04+5:30

Hathras Gangrape, Rahul Gandhi Arrested, Ashok Chavhan News: संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

"Even Congress can hold the collar of a BJP leader, that is enough strength Says Ashok Chavan | “काँग्रेस कार्यकर्तेही भाजपा नेत्याची कॉलर धरू शकतात, तेवढी ताकद आहे, पण...”

“काँग्रेस कार्यकर्तेही भाजपा नेत्याची कॉलर धरू शकतात, तेवढी ताकद आहे, पण...”

Next
ठळक मुद्देपोलीस प्रशासन कुटुंबाची अनुमती न घेता मध्यरात्री लपून-छपून परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार करतात, हा सगळा प्रकार अतिशय क्रूरराहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला जात असतील तर त्यात काहीही गैर नव्हते. तरीही त्यांना का अडवले गेलेउत्तर प्रदेशात लोकशाहीचे, कायद्याचे राज्य नसल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशात जंगल राज

मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यातच हाथरसमधील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना यूपी पोलिसांनी अडवलं, इतकचं नाही तर राहुल गांधी यांच्यासोबत पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांना अटक केली. यावरुन काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांनी केलेल्या दंडेलीने उत्तरप्रदेशात जंगलराज असल्याचे सिद्ध झालं, हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ज्या पद्धतीने रोखण्यात आले, धक्काबुक्की झाली, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले ते पाहता उत्तर प्रदेशात लोकशाहीचे, कायद्याचे राज्य नसल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशात जंगल राज आहे, असे नेहमीच म्हटले जाते आणि आज काँग्रेस नेत्यांना रोखून सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, अत्याचार दडपण्याचा प्रयत्न झाला, सर्व कायदे-नियम धाब्यावर बसवण्यात आले, माणुसकीला हरताळ फासला गेला, ते पाहता उत्तर प्रदेशात खरोखरच जंगल राज आहे, हे स्वतः तेथील राज्य सरकारनेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले असं त्यांनी सांगितले.

तसेच एका तरूणीवर अत्याचार होतो, निर्घुण हत्या होते, तिला वेळेवर उपचार मिळत नाहीत, पीडित कुटुंबाच्या तक्रारीची वेळेवर दखल घेतली जात नाही, शेवटी त्या मुलीचा दुर्दैवी अंत होतो आणि पोलीस प्रशासन कुटुंबाची अनुमती न घेता मध्यरात्री लपून-छपून परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार करतात, हा सगळा प्रकार अतिशय क्रूर, अमानुष आणि संवेदनशून्य आहे. या घटनेबद्दल उत्तर प्रदेश सरकारचा करावा तेवढा निषेध कमी ठरेल. अशा परिस्थितीत पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आणि तिथे नेमके काय घडले, याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला जात असतील तर त्यात काहीही गैर नव्हते. तरीही त्यांना का अडवले गेले, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने दिले पाहिजे. तसेच या संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्तेही भाजप नेत्यांची कॉलर धरू शकतात. तेवढी ताकद त्यांच्यात आहे. पण आमची ती संस्कृती नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला तशी शिकवण दिलेली नाही. आम्ही गांधी विचारधारेवर विश्वास ठेवून लोकशाही मार्गाने काम करणारी मंडळी आहोत असा इशाराही मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला दिला आहे.

१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.

Web Title: "Even Congress can hold the collar of a BJP leader, that is enough strength Says Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.