शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

निवडणूक आयोगाची 2 निर्मात्यांना नोटीस; मालिकांमधील भाजपाचा प्रचार भोवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 5:33 PM

24 तासांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश

मुंबई: टीव्ही मालिकांमधून भाजपाचा प्रचार केल्याप्रकरणी दोन निर्मात्यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. भाभीजी घर पर है आणि तुझसे हे राबता या मालिकांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार होत असल्याबद्दल काँग्रेसनं तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगानं दोन्ही मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. 24 तासांमध्ये स्पष्टीकरण देण्याच्या सूचना आयोगानं दिल्या आहेत. भाभीजी घर पर है आणि तुझसे हे राबता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार होत असल्याचा दावा काँग्रेसनं केला होता. या प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसनं मालिकेच्या निर्मात्यांवर आणि चॅनेलवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 'भारतीय जनता पार्टीचं राजकारण दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जात आहे. प्रचारासाठी भाजपाकडून कार्यक्रमाचा वापर करण्यात करण्यात येत आहे. पराभवाच्या भितीने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे भाजपा अशाप्रकारे मालिकांच्या माध्यमातून प्रचाराचं तंत्र वापरत आहे,' असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं होतं. सध्या देशभरात राजकीय पक्ष एकमेकांविरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करत असतात. भाजपाकडून आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट, ट्रेनमधील ‘मैं भी चौकीदार’  लिहिलेले चहाचे कप, 'नमो टीव्ही’, तसंच आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन, विमानतळ याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग