शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना, देवेंद्र फडणवीसांचा अध्यक्ष महोदयांना मिश्किल सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 1:41 PM

आमदारांना फास्टॅग लावण्याची सुविधा विधीमंडळाच्या परिसरात उपलब्ध करून देण्यात आल्याचा उल्लेख झिरवळ यांनी केला होता.

ठळक मुद्देआमदारांना फास्टॅग लावण्याची सुविधा विधीमंडळाच्या परिसरात उपलब्ध करून देण्यात आल्याचा उल्लेख झिरवळ यांनी केला होता.देवेंद्र फडणवीस यांनी केला मिश्किल सवाल

आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. कामकाजाला सुरूवात झाल्यापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवण्यात येत आहेत. परंतु आज सभागृहात घडलेल्या एका प्रसंगांमुळे संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. विधानसभेचे काळजीवाहून अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी वाचलेल्या सूचनेनंतर सभागृहात हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. सभागृहाचं कामकाज सुरू असताना झिरवळ यांनी एक सूचना वाचली. दरम्यान, विधानसभेच्या सदस्यांना FASTag चं मोफत वाटप करण्यात येणार असल्याचं याद्वारे सांगण्यात आलं. परंतु ही सूचना वाचताना झिरवळ यांना फास्टॅगचा उल्लेख फॉस्टिंग असा केला. त्यानंतर सभागृहातील सदस्यांनी त्यांना ही चूक लक्षात आणून दिली. यानंतर झिरवळ यांनी ही सूचना घाईघाईत वाचताना आमदारांना फास्टॅग लावण्याची सुविधा विधीमंडळाच्या परिसरात उपलब्ध करून देण्यात आली असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं म्हटलं. दरम्यान, यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उभं राहत नरहरी झिरवळ यांना एक प्रश्न केला. अध्यक्ष महोदय FASTag हा गाड्यांना लावाचा की आमदारांना असा मिश्किल सवाल त्यांनी यावेळी केला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटFastagफास्टॅगcarकार