शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

आदित्य ठाकरेंवर खालच्या शब्दात टीका, नितेश राणे म्हणाले- माझे शब्द मागे घेतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 2:19 PM

Nitesh Rane Controvercial Statement on Aditya Thackeray: शिवसेनेकडून जोरदार विरोध झाल्यानंतर नितेश राणेंनी शब्द परत घेतले

ठळक मुद्देभाजप आमदारांची विधानसभेच्या पायऱ्यांवर भरवली प्रतिविधानसभा नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा मुंबईत प्रचंड गोंधळ राडा

मुंबई:भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलताना खालच्या शब्दात टीका केली होती. काल(दि.7) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपकडून भरवण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत 'आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का ? त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल', अशी खालच्या पातळीवरची टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईत प्रचंड गोंधळ घातला. यानंतर आता नितेश राणेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 'माझे शब्द मागे घेतो’ असे ट्विट राणेंनी केल आहे. 

काल आणि परवा राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडले. अतिशय वादग्रस्त ठरलेल्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्या कारवाईचा निषेध म्हणून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवली होती. इथेच भाषण करताना नितेश राणेंनीनी आदित्य ठाकरेंवर ही घणाघाती टीका केली.

काय म्हणाले नितेश राणे?यावेळी भाषण करताना नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे घराणे काढले. आदित्य ठाकरे यांचेच वंशज आहेत का ? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे आक्षेपार्ह वक्तव्य नितेश राणेंनीनी केले. नितेश यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईत प्रचंड राडा केला. नितेश राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. या सर्व गोंधळानंतर नितेश राणे यांना उपरती झाली आणि  त्यांनी आज त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. राणेंनी ट्विट केले की, 'विधानभवनाबाहेर माझ्या कालच्या भाषणामध्ये मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता. तो अनेकांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. त्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर, मी माझे शब्द परत घेतो', असे ट्विट नितेश राणे यांनी केले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे Maharashtraमहाराष्ट्रAditya Thackreyआदित्य ठाकरेMumbaiमुंबईBJPभाजपा