शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान; भाजपाच्या जाहिरनाम्यावर खुलासा

By प्रविण मरगळे | Updated: October 29, 2020 09:42 IST

Corona vaccine PM Narendra Modi News: देशात लस उपलब्ध होताच सर्वांना ही लस दिली जाईल. कोणालाही वगळण्यात येणार नाही अशी खात्री मी देशाला देतो असं मोदी म्हणाले.

ठळक मुद्देभारत सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आणि लोकांच्या मदतीने बऱ्याच जणांचे जीव वाचलेलॉकडाऊन लागू करण्याचा आणि त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्याचा कालावधी पूर्णपणे योग्य होता सणांच्या दिवसात लोकांनी अधिक जागरूक असले पाहिजे, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही

नवी दिल्ली - देश आणि जगात कोरोना विषाणूचं संकट कायम आहे. सध्या भारतात कोरोनाच्या अनेक लसींवर चाचण्या सुरू आहेत, या सगळ्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात कोविड १९ वरील लस उपलब्ध होईल तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाला ती लस देण्यात येईल, यातून कोणीही सूटणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी कोरोना लसीवर भाष्य केलं आहे. लसीच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात लस उपलब्ध होताच सर्वांना ही लस दिली जाईल. कोणालाही वगळण्यात येणार नाही अशी खात्री मी देशाला देतो. भारत सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आणि लोकांच्या मदतीने बऱ्याच जणांचे जीव वाचले, लॉकडाऊन लागू करण्याचा आणि त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्याचा कालावधी पूर्णपणे योग्य होता असं मोदी म्हणाले.

तसेच कोरोना विषाणूचं संकट अद्यापही कायम आहे, अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहिले पाहिजे. सणांच्या दिवसात लोकांनी अधिक जागरूक असले पाहिजे, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. लस वितरणाची तयारी सध्या भारत सरकारकडून केली जात आहे, जेणेकरून वेळ येताच संपूर्ण देशामध्ये ही लस उपलब्ध होऊ शकेल. एका अंदाजानुसार सर्व देशवासीयांना लस देण्यासाठी सरकारने सुरुवातीला ५० हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. एका व्यक्तीला लस देण्यासाठी ३८५ रुपयांपर्यंत खर्च होईल असंही सांगण्यात आलं आहे.

तथापि, अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही किंवा भारत सरकारने कोणतीही अधिकृत योजना जाहीर केलेली नाही. परंतु देशातील शास्त्रज्ञ सतत लस बनवण्याचे काम करत आहेत आणि या लसीची चाचणी आता पुढच्या टप्प्यावर पोहोचली आहे. वास्तविक, नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात घोषित केले होते की, सत्तेत आल्यानंतर भाजपा बिहारमधील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देणार आहे. त्यानंतर अनेकांनी भाजपाच्या या घोषणेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले. यावरून वादंग निर्माण झाला.  विरोधकांनी भाजपाच्या यो घोषणेवर निशाणा साधला. निवडणुकीच्या फायद्यासाठी कोरोनाचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपावर करण्यात आला. मात्र केंद्र सरकार राज्यांना ही लस उपलब्ध करून देईल त्यानंतर भाजपा सरकार राज्य सरकार पातळीवर जनतेसाठी मोफत पुरवेल असं स्पष्टीकरण भाजपानं दिलं होतं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा