coronavirus: "कोरोनाला रोखण्यात सरकारचे प्रयत्न अपुरे, राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा,’’ काँग्रेस नेत्याचे मोदींना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 10:18 AM2021-04-21T10:18:03+5:302021-04-21T10:25:21+5:30

Congress leader Ashish Deshmukh's letter to PM Narendra Modi : एकीकडे राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर विरोधकांकडून टीका होत असतानाच आता काँग्रेसच्या नेत्यानेही ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला आहे.

coronavirus: "Maharashtra government's efforts to stop corona are insufficient, impose health and economic emergency in the state", Congress leader Ashish Deshmukh's letter to PM Narendra Modi | coronavirus: "कोरोनाला रोखण्यात सरकारचे प्रयत्न अपुरे, राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा,’’ काँग्रेस नेत्याचे मोदींना पत्र 

coronavirus: "कोरोनाला रोखण्यात सरकारचे प्रयत्न अपुरे, राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा,’’ काँग्रेस नेत्याचे मोदींना पत्र 

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रामध्ये दररोज सापडताहेत ६० हजारांहून अधिक रुग्णकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात निर्माण झाली आहे बिकट परिस्थिती या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यामध्ये घटनेतील कलम ३६० अन्वये किमान दोन महिन्यांसाठी आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करावी

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण ६० हजारांवर पोहोचल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, कोरोनाला रोखण्यासाठी आज रात्रीपासून राज्यात कठोर लॉकडाऊन लावण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. एकीकडे राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर विरोधकांकडून टीका होत असतानाच आता काँग्रेसच्या नेत्यानेही ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला आहे. ( "Maharashtra government's efforts to stop corona are insufficient, impose health and economic emergency in the state", Congress leader Ashish Deshmukh's letter to Modi)

काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका केली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे. 

आशीष देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. त्यात ते म्हणतात की, महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यामध्ये घटनेतील कलम ३६० अन्वये किमान दोन महिन्यांसाठी आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे, असे आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा ६० हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. काल राज्यामध्ये कोरोनाचे ६२ हजार ०९७ नवे रुग्ण सापडले. तर दिवसभरात ५१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर गेल्या २४ तासांत ५४ हजार २२४ जणांनी कोरोनावर मात केली होती. 

Web Title: coronavirus: "Maharashtra government's efforts to stop corona are insufficient, impose health and economic emergency in the state", Congress leader Ashish Deshmukh's letter to PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.