काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव?; अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 03:39 PM2021-02-04T15:39:24+5:302021-02-04T15:40:04+5:30

माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी केलं यावर वक्तव्य

Congresss proposal for the post of Deputy Chief Minister post Ajit Pawar clarifies | काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव?; अजित पवार म्हणाले...

काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव?; अजित पवार म्हणाले...

Next
ठळक मुद्देमहाविकास आघाडी अस्तित्वात येण्य़ापूर्वी बड्या नेत्यांनी निर्णय घेतले, त्याची अंमलबजावणी करतोय, पवार यांचं वक्तव्य

"महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीनही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत. ते संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम आम्ही करतोय. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात बाकीच्यांनी चर्चा करण्याचे कारण नाही," असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. 

यावेळी काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला अजित पवार यांना विचारला. यावर उत्तर देताना अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. यावेळी अजित पवार यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरही भाष्य केलं. 

"केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचं समर्थन करता येत नाही त्यामुळे राज्य सरकारबद्ल फडणवीस असं वक्तव्य करत आहेत. उलट केंद्रसरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल १०० रुपये लिटर झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नये," असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. यावेळी त्यांनी वीज दराबाबतही भाष्य केलं. वीज दराबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून शेतकऱ्यांची ४५ हजार कोटीची थकबाकी होती, त्यातील केवळ १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. ३० हजार कोटी रुपये माफ केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ठवीज कंपन्या अडचणीत असतानाही ३० हजार कोटी रुपये माफ करून अडचणीत असलेल्या जनतेला राज्य सरकारने आधार दिला असल्याचं ते म्हणाले.

सेलिब्रिटींना ट्वीट करण्याचा अधिकार

"सेलिब्रेटींनी काय ट्विट् करावे हा त्यांचा अधिकार आहे. आपल्याला घटनेने स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार दिला आहे.त्याबद्दल आम्हाला टिप्पणी करण्याची गरज नाही. उलट एवढं आंदोलन पेटलेले असतानाही केंद्रसरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीही दिले नाही," असा आरोपही अजित पवार यांनी केला. 
 

Web Title: Congresss proposal for the post of Deputy Chief Minister post Ajit Pawar clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.