शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हिंसा नकाे, आंदोलन शांततेत करण्याचे काँग्रेसचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 06:46 IST

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर केली टीका

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर टीका करताना काँग्रेसने आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. राहुल गांधी यांनी हिंसाचाराबाबत ट्विट करताना म्हटले की, ‘हिंसा कुठल्याही समस्येचे समाधान नाही. दुखापत कुणालाही होऊ शकते, पण नुकसान मात्र आपल्या देशाचेच होईल. देशहितासाठी कृषीविरोधी कायदे परत घ्या.’

राहुल गांधी यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट केले, ‘दिल्लीचे दृश्य चकित करणारे होते. काही लोकांनी केलेली हिंसा स्वीकार्य नाही. त्यामुळे शांतीपूर्ण मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांनी कमावलेल्या इभ्रतीवर वाईट प्रभाव होईल. शेतकरी नेत्यांनी यापासून स्वत:ला वेगळे केले आणि ट्रॅक्टर रॅलीला वाऱ्यावर सोडले. कॅप्टन यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की दिल्ली सोडावी आणि सीमेवर आपल्या आंदोलन स्थळी पोहचावे.’

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी हिंसा चुकीची असल्याचे सांगत यासाठी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जर तिन्ही काळे कायदे परत घेतले असते तर ही घटना घडली नसती. त्यांनी तिन्ही कृषी कायदे शक्य तेवढ्या लवकर परत घेण्याचा सल्ला दिला. काँग्रेस, राकाँसह अन्य पक्षांनी हिंसाचाराचा निषेध केला, पण यासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरविले.

ममतांचा केंद्राला दोष
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी दिल्लीतील हिंसाचाराबद्दल केंद्र सरकारलाच दोष दिला. केंद्राची ताठर भूमिका आणि शेतकऱ्यांबद्दलची उदासीन वृत्ती यामुळेच हा प्रकार घडला, असे त्या म्हणाल्या. सरकारने आता त्वरित शेतकऱ्यांशी बोलणी करून नवीन कायदे मागे घ्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संपNarendra Modiनरेंद्र मोदी