शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'त्या' सुसाईड नोटवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?; प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 10:24 IST

Congress unhappy with ncp over investigation in MP Mohan Delkar Death Case: प्रकरणाचा तपास वेगानं होत नसल्यानं काँग्रेस नाराज; गृहखात्याबद्दलची तक्रार मंत्रिमंडळ बैठकीत केली जाण्याची शक्यता

मुंबई: अपक्ष खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचं पडसाद आज होणाऱ्या राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात गृह खात्याकडून वेगानं तपास होत नसल्याची काँग्रेसची तक्रार आहे. गृहखात्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख यांच्याकडे आहे. डेलकर प्रकरणात गृहखातं ढिलाई दाखवत असल्याचं काँग्रेस नेत्यांना वाटतं. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. (Congress unhappy with investigation in MP Mohan Delkar Death Case)मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजपा नेत्यांची नावं, चौकशीबाबत फडणवीस म्हणतात...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. पत्रात डेलकर यांनी भाजपच्या काही बड्या नेत्यांच्या नावांचादेखील उल्लेख केला आहे. मात्र असं असूनही गृह खातं प्रकरणाचा तपास वेगानं करत नसल्याची काँग्रेस तक्रार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत काँग्रेस नेते हा मुद्दा उपस्थित करू शकतात किंवा यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करू शकतात.खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं नाव; काँग्रेसचा गौप्यस्फोटकाँग्रेसचा नेमका आक्षेप काय?सुशांत सिंह राजपूत, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून भारतीय जनता पक्षानं सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पालघर मॉब लिन्चिंग प्रकरणातही भाजपनं आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपनं अनेक प्रकरणं लावून धरत महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न केले. मात्र डेलकर प्रकरणात भाजपच्या नेत्यांची नावं सुसाईड नोटमध्ये असूनही गृह खातं अतिशय संथपणे तपास करत असल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे. त्यामुळे गृह खात्यावर दबाव वाढवण्याची रणनीती काँग्रेसनं आखली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSushant Singhसुशांत सिंगPooja Chavanपूजा चव्हाण