मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजपा नेत्यांची नावं, चौकशीबाबत फडणवीस म्हणतात...

By बाळकृष्ण परब | Published: March 1, 2021 01:37 PM2021-03-01T13:37:42+5:302021-03-01T13:56:28+5:30

Mohan Delkar's suicide News : अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. तसेच त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही भाजपा नेत्यांची नावे असल्याचा दावा करण्यात येत आहे

In Mohan Delkar's suicide note, the names of BJP leaders, Devendra Fadnavis says about the inquiry ... | मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजपा नेत्यांची नावं, चौकशीबाबत फडणवीस म्हणतात...

मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजपा नेत्यांची नावं, चौकशीबाबत फडणवीस म्हणतात...

Next

मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव येऊन त्यांना राजीनामा द्यावा लागल्याने अधिवेशनादरम्यान, महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. त्याचवेळी दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. तसेच त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही भाजपा नेत्यांची नावे असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरून चौकशी करण्याची घोषणाही राज्य सरकारने केली आहे. त्यावरून भाजपाला घेरण्याचा प्रयत्नही सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचीही सखोल चौकशी करा, असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे.  ()

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाबाबत फडणवीस म्हणाले की, आत्महत्या कुणाचीही असो त्याची चौकशी झालीच पाहिजे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणावरून सुसाईड नोट सापडली आहे. सुसाइड नोट सापडल्यावर चौकशी ही होतेच. कुणीही आरोप करत असले तरी या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपाच्या नेत्याचं नाव नाही, असे मी दाव्यानिशी सांगू शकतो. जर त्या सुसाइ़ड नोटमध्ये भाजपाच्या नेत्याचं नाव असतं तर ते एवढ्यात जाहीर केलं असतं, असा टोला फडणवीस यांनी लगावला.  

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरूनही फडवीस यांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. फडणवीस म्हणाले की, कालच्या पत्रकार परिषदेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. अशी स्थिती त्यांच्यावर येऊ नये. सगळे पुरावे असताना धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक धैर्य येत नाही. मुख्यमंत्र्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला असतानाही ते दिसत होतं. 

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पूजा चव्हाण प्रकरणात समोर आलेल्या क्लीप्स खऱ्या की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडलं ते खरं की खोटं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असे आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसेच कुणाला साधूसंत ठरवायचं असेल तर ठरवा. मात्र तुमच्या नैतिकतेचं काय असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. 

Web Title: In Mohan Delkar's suicide note, the names of BJP leaders, Devendra Fadnavis says about the inquiry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.