शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 10:24 IST

Goa Nightclub Fire News: प्राथमिक तपासात, ही आग सिलेंडर स्फोटामुळे नव्हे, तर इलेक्ट्रिक फटाक्यांच्या ठिणगीतून लागल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री ११:४५ च्या सुमारास ही ठिणगी क्लबच्या लाकडी सीलिंगवर पडली आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत आगीने रौद्र रूप धारण केले.

गोव्यातील अरपोरा परिसरात असलेल्या 'बिर्च बॉय रोमियो लेन' नाईट क्लबमध्ये शनिवारच्या रात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या अग्निकांडात २५ लोकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतांश लोकांचा बळी धुरामुळे गुदमरून गेला आहे. या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर गोवा सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे.

प्राथमिक तपासात, ही आग सिलेंडर स्फोटामुळे नव्हे, तर इलेक्ट्रिक फटाक्यांच्या ठिणगीतून लागल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री ११:४५ च्या सुमारास ही ठिणगी क्लबच्या लाकडी सीलिंगवर पडली आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत आगीने रौद्र रूप धारण केले.

या दुर्घटनेतील मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे क्लबमधील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव हे आहे. क्लबमध्ये येण्या-जाण्यासाठी केवळ एकच मार्ग होता, जो आगीमुळे पूर्णपणे बंद झाला. जीव वाचवण्यासाठी तळघरात धावलेल्या २३ कर्मचाऱ्यांचा व पर्यटकांचा दुर्दैवी अंत झाला. तळघरात हवा खेळती ठेवण्याची कोणतीही सोय नसल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. आग विझल्यानंतर तळघरात मृतदेह एकावर एक पडलेले आढळले, हे दृश्य मन सुन्न करणारे होते. संकरीत रस्त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही ४०० मीटर दूर थांबावे लागले, ज्यामुळे वेळेवर मदत पोहोचू शकली नाही.

मालकांवर एफआयआर, ४ कर्मचारी अटकेत: घटनेची गंभीर दखल घेत गोवा पोलिसांनी नाईट क्लबचे मालक सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे विशेष पथक दिल्लीकडे रवाना झाले आहे. यासह, क्लबच्या चार कर्मचाऱ्यांना (जनरल मॅनेजर, गेट मॅनेजर, बार मॅनेजर) तातडीने अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

पंतप्रधानांकडून नुकसान भरपाई: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Nightclub Fire: Electric Fireworks Sparked Blaze, Arrests Loom

Web Summary : Electric fireworks ignited a Goa nightclub, killing 25. Safety lapses, a single exit, and a locked basement trapped victims. Police arrested four employees and are pursuing the owners, promising strict action. PM announced compensation for victims.
टॅग्स :goaगोवा