“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 02:30 PM2021-07-14T14:30:04+5:302021-07-14T14:37:56+5:30

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे.

congress rahul gandhi criticises pm modi govt over national security | “भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Next
ठळक मुद्देराहुल गांधींचा पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणाराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून केला मोठा आरोपमोदी सरकारने देशाच्या सुरक्षेचे राजकारण केल्याचा दावा

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात दहशतवादविरोधी पथकाने दहशतवाद्यांना अटक मोठा कट उधळून लावल्यानंतर आता देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्येही काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यावरून आता काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली असून, भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता, असा मोठा आरोप केला आहे. (congress rahul gandhi criticises pm modi govt over national security)

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

देशातील कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण मोहीम, लसींची टंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई यांवरून सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी टीका करताना दिसत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे.

भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले असून, मोदी सरकारने परराष्ट्र आणइ संरक्षण धोरणाचे राजकारण करून देशाला कमकुवत करण्याचे काम केले. भारत एवढा असुरक्षित कधीच नव्हता, असा मोठा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राहुल गांधी यांनी टीका केली होती. मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला होता.

“रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची गेल्या महिन्यात तीनवेळा भेट घेणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि वरिष्ठ नेते वेणुगोपालदेखील उपस्थित आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे आव्हान उभे करणे आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. 
 

Web Title: congress rahul gandhi criticises pm modi govt over national security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.