Maharashtra Vidhan Sabha : राज्यपाल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, काँग्रेस नेत्याचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 11:07 AM2021-03-03T11:07:10+5:302021-03-03T11:13:56+5:30

Congress MLA Sanjay Jagtap  criticizes Governor Bhagat singh Koshyari : काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे.

Congress MLA Sanjay Jagtap  criticizes Governor Bhagat singh Koshyari | Maharashtra Vidhan Sabha : राज्यपाल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, काँग्रेस नेत्याचा टोला 

Maharashtra Vidhan Sabha : राज्यपाल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, काँग्रेस नेत्याचा टोला 

Next
ठळक मुद्देगेल्या दोन महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित पडला आहे.

मुंबई : Budget Session 2021: राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित पडला आहे. महाविकास आघाडी सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, पण त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. यावरून पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आमदार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपाल म्हणजे हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी असल्याचा उपरोधिक टोला आमदार संजय जगताप यांनी लगावला. (Congress MLA Sanjay Jagtap  criticizes Governor Bhagat singh Koshyari)

बुधवारी विधानसभेत संजय जगताप बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर झालेल्या भाषणात आमदार संजय जगताप यांनी राज्यपालांवर टीका केली. एकीकडे राज्यपाल कोरोना काळातील कामगिरीबद्दल सरकारचे कौतुक करतात, दुसरीकडे राज्यपाल राज्य सरकारशी संघर्ष करतात. राज्यपालांची ही कृती म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार कन्हैयालाल चतुर्वेदीसारखी असल्याचे संजय जगताप यांनी म्हटले. याचबरोबर, संजय जगताप यांनी कोरोना काळात आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती यावेळी सभागृहात दिली.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित पडला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, मात्र, अद्याप या नावांना राज्यपालांकडून मंजुरी मिळालेली नाही. याच कारणामुळे राज्य सरकारने अनेकवेळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

"आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबून ठेवलेले आमदार मोकळे करावेत"
मंगळवारी संजय राऊत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टोला लगावला. ते म्हणाले, "महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपालांना महाराष्ट्रात रमावं वाटत असेल. आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेने त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवले आहेत. ते त्यांनी मोकळे करावेत." याचबरोबर, राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल,असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला. 
 

Web Title: Congress MLA Sanjay Jagtap  criticizes Governor Bhagat singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.