शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"अदानींची संपत्ती १२ लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली?... शून्य..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 18:29 IST

Gautam Adani : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे, अहवालातून खुलासा

ठळक मुद्देभारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढगौतम अदानींबाबतच्या वृत्तावरून राहुल गांधींचं ट्वीट

गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती वेगानं वाढत आहे. अदानी यांच्या संपत्ती वाढीचा वेग जेफ बेझोस आणि अॅलन मस्कपेक्षा अधिक आहे. या वर्षात अदानी यांची संपत्ती सर्वाधिक वेगानं वाढत आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार या वर्षी गौतम अदानी यांची संपत्ती २०२१ या वर्षात १६.२ अब्ज डॉलर्सवरून वाढून जवळपास ५० अब्ज डॉलर्स इतकी वाढली आहे. यावरून आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.राहुल गांधी यांनी एका अहवालाचा हवाला देत एक ट्वीट केलं आहे. यामध्ये गौतम अदानी यांची संपत्ती जेफ बझोस आणि अॅलन मस्क यांच्यापेक्षाही वेगानं वाढल्याचं म्हटलं आहे. यावरून राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी यांसदर्भात एक ट्वीट करत नागरीकांना त्यांची संपत्ती किती वाढली आहे, असा सवाल केला आहे.  "तुमची संपत्ती २०२० मध्ये किती वाढली? शून्य. तुम्ही जण्यासाठी संघर्ष करत आहात. परंतु त्यांनी १२ लाख कोटी रूपये कमवून आपली संपत्ती ५० टक्क्यांनी वाढवली आहे. तुम्ही मला सांगू शकता असं का?," अशा आशयाचं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. मुकेश अंबानींनादेखील टाकलं मागेगौतम अदानी यांनी संपत्ती वाढीच्या शर्यतीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनादेखील मागे टाकलं आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या मुकेश अंबानींच्या संपत्तीत चालू वर्षात ८१० कोटी रुपयांनी वाढली आहे. मात्र एकूण संपत्तीचा विचार केल्यास अदानी अंबानी यांच्यापेक्षा बरेच मागे आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार अंबानी यांची नेटवर्थ (निव्वळ कमाई) ८,४८० कोटी डॉलर इतकी आहे. तर अदानी यांच्या संपत्तीचं मूल्य ५ हजार कोटी डॉलर आहे.

उद्योगाचा वेगानं विस्तारन्याका ऍडव्हायजरी सर्व्हिसेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चंदिरमानी यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, अदानी अतिशय वेगानं त्यांच्या उद्योगाचा विस्तार करत आहेत. बंदरं, विमानतळं, कोळसा खाणी या क्षेत्रांमध्ये अदानी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. आता ते डेटा सेंटर उद्योगातही उतरत आहेत. अदानी एंटरप्रायझेसनं गेल्याच महिन्यात भारतात १ गिगाव्हॅट क्षमतेचं डेटा सेंटर उभारण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. 

टॅग्स :Adaniअदानीamazonअ‍ॅमेझॉनRelianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीMONEYपैसाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी