शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पुडुचेरीत राहुल गांधींनी केलं राजीव गांधींच्या मारेकऱ्यांवर वक्तव्य; म्हणाले, "मी त्यांना माफ..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 13:22 IST

Rahul Gandhi on Rajiv Gandhi : "माझे वडील अजूनही माझ्यात आहेत. ते माझ्याद्वारे बोलत आहेत," असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

ठळक मुद्दे "माझे वडील अजूनही माझ्यात आहेत. ते माझ्याद्वारे बोलत आहेत," राहुल गांधी यांचं वक्तव्यवडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलं : राहुल गांधी

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या करण्यात आली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुडुचेरी येथे संवाद साधताना यावर भाष्य केलं. आपले वडिल राजीव गांधी यांच्या हत्येमुळे आपल्याला खुप दु:ख झालं होतं. परंतु त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांप्रती आपल्या मनात कोणताही राग अथवा द्वेष नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आपण त्यांना माफ केल्याचंही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी पुडुचेरी येथी एका महाविद्यालयात विद्यार्थीनींशी संवाद साधत होते.चर्चेदरम्यान एका विद्यार्थीनीनं राहुल गांधी यांना त्यांच्या वडिलांच्या हत्येबद्दल प्रश्न विचारला. तसंच याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत? असा सवालही केला. "हिंसाचार तुमच्याकडून काहीही हिसकावून घेऊ शकत नाही. मला कोणाच्याही बाबतीत राग नाही. मी माझ्या वडिलांना गमावलं आणि ती माझ्यासाठी कठिण वेळ होती. आपलं हृदय वेगळं करण्यासारखी ही गोष्ट होती," असं राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले. "मला खुप दु:ख झालं होतं. परंतु मला राग नाही. माझ्या मनात कोणताही द्वेष नाही. मी त्यांना माफ केलं आहे," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. "हिंसाचारातून काहीही हिसकावून घेतलं जाऊ शकत नाही. माझे वडील अजूनही माझ्यात आहेत. माझे वडील माझ्याद्वारे बोलत आहेत," असंही त्यांनी नमूद केलं. सर नको राहुल म्हणायावेळी त्यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधताना आपल्याला सर नाही, तर राहुल म्हणून संबोधण्याचं आवाहन केलं. यावेळी एका विद्यार्थीनीनं राहुल गांधी यांना त्यांचे मित्र आणि गर्लफ्रेन्डबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना त्यांनी आपले अनेक मित्र असल्याचं सांगितलं. परंतु त्यांनी गर्लफ्रेन्डबाबत प्रश्नाचं उत्तर देताना यावर पुन्हा कधीतरी यावर बोलू असं म्हटलं.यावेळी एका विद्यार्थीनीनं त्यांच्याकडे आपल्याला इंजिनिअरिंग शिक्षण घेता येत नसल्याची खंत व्यक्त केली. यावरून राहुल गांधी यांनी तिला आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा सल्ला देत मदतीचं आश्वासन दिलं. तसंच तिला वाटत असलेल तर तिच्या आई-वडिलांशीही चर्चा करू असंही ते म्हणाले. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या सुटकेचं काही लोकांनी समर्थन केलं आहे. परंतु तामिळनाडू काँग्रेसनं मात्र याचा विरोध केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसpuducherry-pcपुडुचेरीStudentविद्यार्थी