शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसला विजयाची प्रतिक्षाच; दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 9:45 AM

Pune Vidhan Parishad Election, Pune Teacher constituency: जयंत आसगावकर यांना पहिल्या फेरीत १६ हजार ८७४ मते पण विजयासाठी आवश्यक आकडा अद्याप प्राप्त नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंती क्रमांकाची सर्वाधिक मते पडलेल्या, महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना १६ हजार ८७४ मते पडली आहेत. मात्र विजयी आकडा गाठण्यासाठी आसगावकर यांना बरीच वाट पाहावी लागत आहे. 

       पहिल्या पसंती क्रमांकात सर्वाधिक मते मिळालेल्या आसगावकर यांना विजयासाठी 24 हजार 114 मतांची आवश्यकता आहे. मात्र मोजणीचे 'एलेमिनेशन' चे 19 फेऱ्या झाल्या तरी अपेक्षित मतसंख्या गाठता आलेली नाही. शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पार पडलेल्या 19 फेऱ्याअखेर आसगावकर यांना 17 हजार 400 मते पडली आहेत. तर जितेंद्र पवार यांना ५ हजार 947 मते मिळाली आहेत. तर विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 288 मते मिळाली आहेत. 

पुणे विभागात पदवीधर पेक्षा शिक्षक मतदार संघातील मतमोजनीचा निकाल सर्वात अगोदर लागेल असे चित्र होते. परंतु प्रत्यक्षात हे चित्र उलटे झाले. पदवीधर मध्ये अरुण लाड यांनी पहिल्याच पसंतीत विजयी कोट्या पेक्षा अधिक मते मिळवली. परिणामी  'एलेमिनेशन' च्या पुढील फेऱ्यांची आवश्यकताच आली नाही.     तर दुसरीकडे शिक्षक मतदार संघात आसगावकर यांनी 6 हजार 112 मतांची पहिल्या पसंती क्रमांकात विक्रमी आघाडी घेऊनही त्यांना आवश्यक विजयी आकडा गाठण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शिक्षक मतदार संघात मतदानाचा आकडा पाहता एकूण 32 फेऱ्या होणार आहे. शुक्रवारी सकाळी 9 पर्यंत 19 फेऱ्या झाल्या होत्या.

पदवीधर मतदारसंघ जिंकला

पुणे पदवीधर मतदार संघात पहिल्याच पसंती क्रमांकाची तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते घेऊन , महा विकास आघाडीचे अरुण गणपती लाड विजयी झाले आहेत. त्यांनी 48 हजार 824 मतांनी बीजेपीचे संग्राम देशमुख यांचा  पराभव केला आहे. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली.

       पदवीधर करिता २ लाख 47 हजार 50 इतके मतदान झले होते. एकूण मतदानाच्या तुलनेत ही टक्केवारी 57. 96 टक्के इतकी होती. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. मतमोजणीत यापैकी 2 लाख 28 हजार 272 हे वैध मतदान ठरले. त्यामुळे विजयी उमेदवारास 1 लाख 14 हजार 137 हा विजयी कोटा ठरविण्यात आला. एकूण 112 टेबल वर ही मतमोजणी सुरू होती. अपेक्षेप्रमाणे ही मतमोजणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत चालेल असे बोलले जात होते. मात्र पहिल्याच पसंती क्रमांकात लाड यांनी तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळवून आपला विजय निश्चित केला. पदवीधर निवडणूक च्या निकषानुसार वैध मतांच्या 50 टक्के अधिक 1 अशी मते लाड यांनी मिळविल्याने शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास लाड यांचा विजय निश्चित झाला आहे. सकाळी 10 वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकारी यांच्याकडून त्यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाPuneपुणे