शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

चिराग पासवान यांनाच गटनेतेपदावरून हटविले; ‘लोजपा’च्या ५ खासदारांचे बंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 07:23 IST

पशुपतीकुमार पारस यांचा आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकजनशक्ती पार्टीच्या (लोजपा) पाच खासदारांनी पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू व चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस यांनी त्यात पुढाकार घेतला आहे. लोजपाच्या खासदारांनी लोकसभेतील गटनेते चिराग यांना हटवून त्या पदावर पशुपतीकुमार पारस व उपनेतेपदी मेहबूब अली कैसर यांची निवड केली आहे.

पशुपतीकुमार पारस यांचा आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पारस यांनी सांगितले की, लोजपामध्ये मी फूट पाडली नसून उलट त्या पक्षाला वाचविले आहे. माझ्या नेतृत्वाखालील खासदारांचा गट हा एनडीएबरोबरच राहणार आहे, तसेच चिराग पासवान हे देखील पक्षात राहू शकतात.माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चिराग यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. मात्र आता त्यांनाच लोजपाच्या लोकसभा गटनेतेपदावरून त्या पक्षाच्या खासदारांनी हटविल्याने ती शक्यताही संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते.

फुटीची बीजे बिहार विधानसभा निवडणुकांतच n गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांत चिराग पासवान यांनी जनता दल (यू) विरोधात भूमिका घेतली होती. n त्यामागे भाजपची फूस होती अशी चर्चा आहे. एनडीएमध्ये राहूनच चिराग यांनी हे कृत्य केल्याने नितीशकुमार कमालीचे नाराज झाले होते. n चिराग यांच्या भूमिकेमुळे जनता दल (यू)ला ३२ जागा गमवाव्या लागल्या असे पक्षाच्या नेत्यांना वाटते. n लोजपालाही विधानसभेत जिंकून आलेला एकमेव आमदार कालांतराने जनता दल (यू)मध्ये सामील झाला. नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्या मनातील चिरागविषयी राग अद्यापही गेलेला नाही.

 काकांनी ठेवले ताटकळतबिहारमधील राजकीय उलथापालथीनंतर चिराग पासवान आपले काका पशुपतीकुमार पारस यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. मात्र तिथे त्यांना सुमारे २५ मिनिटे ताटकळत ठेवण्यात आले. अखेर चिराग यांना त्या घरात प्रवेश मिळाला, पण काका मात्र भेटले नाहीत.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण