शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

"अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार" 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 8:10 AM

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींवर गेली आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाची देशातील स्थिती, लसीकरण, औषधं असा विविध मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केंद्र सरकारच्या "अब की बार मोदी सरकार" या घोषवाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

 काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार" असं म्हटलं आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अबकी बार करोडो बेरोजगार" हा हॅशटॅग देखील वापरला आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) कोरोना समजलाच नाही असं म्हणत याआधी त्यांनी टीकास्त्र सोडलं होतं. "सरकारला कोरोना संदर्भात अनेकदा सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. कोरोना केवळ एक आजार नाही, कोरोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, जेवढी जागा तुम्ही त्याला द्याल, हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागेच म्हटलं होतं, जागा बंद करा. कोरोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. 

"सरकार आणि मोदींना कोरोना समजलाच नाही; जेवढा वेळ तुम्ही देणार तेवढा तो घातक होणार"

कोरोना, लॉकडाऊन, उपाययोजना आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भाष्य केले. यावेळी, केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोरोना हा केवळ आजार नसून तो बदलणारा आजार आहे. या आजारावर मास्क आणि लॉकडाऊन हा तात्पुरता उपाय आहे. या आजाराला रोखण्यासाठी तीन ते चार प्रकार असल्याचं राहुल यांनी सांगितलं. 

PMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका

लस घेणे हा कायमस्वरुपीचा उपाय आहे. लॉकडाऊन हेही हत्यार आहे, पण यामुळे सर्वसामान्यांचं मोठं नुकसान होत आहे. मास्क, सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊन हे तात्पूरते उपाय असून लसीकरण हाच सर्वात प्रभावशाली आणि कायमस्वरुपीचा उपाय असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. याआधी राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात बरीच समानता असल्याचं म्हणत सणसणीत टोला लगावला होता. "पीएम केअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात, गरजेच्या वेळी दोघांनाही शोधणं कठीण आहे" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला होता. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतPoliticsराजकारणUnemploymentबेरोजगारी