CoronaVirus Live Updates :"सरकार आणि मोदींना कोरोना समजलाच नाही; जेवढा वेळ तुम्ही देणार तेवढा तो घातक होणार"; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 02:54 PM2021-05-28T14:54:31+5:302021-05-28T15:14:46+5:30

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

congress rahul gandhi press conference covid 19 situation pm narendra modi | CoronaVirus Live Updates :"सरकार आणि मोदींना कोरोना समजलाच नाही; जेवढा वेळ तुम्ही देणार तेवढा तो घातक होणार"; राहुल गांधींचा घणाघात

CoronaVirus Live Updates :"सरकार आणि मोदींना कोरोना समजलाच नाही; जेवढा वेळ तुम्ही देणार तेवढा तो घातक होणार"; राहुल गांधींचा घणाघात

Next

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत होती. परंतु आता कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत थोडी दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वैद्यकीय सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे जीव गमावावा लागत आहे. य़ाच दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) कोरोना समजलाच नाही असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "सरकारला कोरोना संदर्भात अनेकदा सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. कोरोना केवळ एक आजार नाही, कोरोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, जेवढी जागा तुम्ही त्याला द्याल, हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागेच म्हटलं होतं, जागा बंद करा. कोरोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा" असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

कोरोना, लॉकडाऊन, उपाययोजना आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भाष्य केले. यावेळी, केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोरोना हा केवळ आजार नसून तो बदलणारा आजार आहे. या आजारावर मास्क आणि लॉकडाऊन हा तात्पुरता उपाय आहे. या आजाराला रोखण्यासाठी तीन ते चार प्रकार असल्याचं राहुल यांनी सांगितलं. 

PMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका

लस घेणे हा कायमस्वरुपीचा उपाय आहे. लॉकडाऊन हेही हत्यार आहे, पण यामुळे सर्वसामान्यांचं मोठं नुकसान होत आहे. मास्क, सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊन हे तात्पूरते उपाय असून लसीकरण हाच सर्वात प्रभावशाली आणि कायमस्वरुपीचा उपाय असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. याआधी राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात बरीच समानता असल्याचं म्हणत सणसणीत टोला लगावला होता. "पीएम केअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात, गरजेच्या वेळी दोघांनाही शोधणं कठीण आहे" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला होता. 

Web Title: congress rahul gandhi press conference covid 19 situation pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.