शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मिशन 2021: भाजपशासित राज्ये लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याच्या प्रयत्नांत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 9:46 AM

Anti Love Jihad Law: २०२१ मध्ये राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत बनवणार मुद्दा

नितिन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तरप्रदेशनंतर भाजपशासित इतर राज्येही लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा बनवण्याच्या तयारीत आहेत. मध्यप्रदेशने याबाबत कायद्याचा मसुदा तयार केला तर हरयाणा, कर्नाटकमध्येही कायद्याची तयारी सुरू आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल, आसाम व इतर राज्यांत भाजप हा मुद्दा मोठा बनवू शकते.

भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले की, लव्ह जिहाद गंभीर प्रश्न आहे. अनेक भगिनी व माता त्याच्या बळी ठरल्या आहेत. हा राज्यांचा प्रश्न असल्यामुळे त्यांनी त्याविरोधात कारवाई करायला हवी. काही राज्य सरकारे लव्ह जिहादविरोधात काम करत आहेत व पुढेही लव्ह जिहादविरोधात कारवाई सुरूच राहील.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य करून राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संगतीत आल्यावर लव्ह जिहादवर शिवसेनेची भूमिका नरमली आहे.

याबाबत भाजपच्या एका केंद्रीय पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, हा एक मोठा मुद्दा आहे. भाजप बहिणी, मुलींच्या सन्मान व स्वाभिमानाच्या संरक्षणासाठी नेहमी बांधील आहे. भाजपशासित राज्ये किंवा गैर भाजपशासित राज्ये असतील तेथे भगिनी- मुलींना फसवण्यात आल्याचे दिसल्यास निश्चितपणे भाजप त्यांच्या पाठीशी उभा ठाकेल.

नितीश सरकारवरही दबाबलव्ह जिहादवर कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारवर दबाब वाढताना दिसतो आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बिहारमध्ये लव्ह जिहादबाबत कायदा बनवावा, असे आव्हान भाजपसमोर ठेवले तर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी नितीश कुमार सरकारला लव्ह जिहादविरोधात कायदा बनवावा असे आवाहन केले. पुढील वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ व केंद्रशासित प्रदेश पुड्डुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यातील फक्त आसाममध्ये भाजपा आपले खाते उघडू शकला आहे. 

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादBJPभाजपाElectionनिवडणूक