शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

"सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 9:56 AM

BJP Ram Kadam And Thackeray Government : जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने अटक केली. यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. 

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझेंची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. 

सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी" असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमची मागणी आहे त्यांचे सरकार सचिन वाझेंचे प्रवक्ता असल्याप्रमाणे वागत होते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते हे संपूर्ण देशाने पाहिले. अखेर त्यांना NIA ने अटक केली आता तरी महाराष्ट्र सरकार देशाची माफी मागत सचिन वाझेंची Narco टेस्ट करणार का?" असा सवाल देखील राम कदम यांनी विचारला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना स्वत: याचं उत्तर द्यावं लागेल असं म्हटलं आहे. आज (14 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जातेय, त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडाली आहे. 

सचिन वाझेंचं Whatsapp स्टेटस

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली होती.  

सचिन वाझेंची 13 तास चौकशी, नंतर अटक; रात्री नेमकं काय झालं?, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर, या प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, या स्कॉर्पिओ कारचे मालक व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करून तत्काळ अटकेची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला होता.  दहशतवाद विरोधी पथकानेही मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत वाझे यांची तब्बल दहा तास चौकशी केली.

टॅग्स :Ram Kadamराम कदमsachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानीArrestअटकUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv Senaशिवसेना