शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Pravin Darekar: "संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत की काय?"; भाजपाने लगावला सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 12:52 IST

BJP Pravin Darekar And Shivsena Sanjay Raut Over Anil Deshmukh :अनिल देशमुखांवरून भाजपाने राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्य करत आहेत असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे.

मुंबई - राज्यातील सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन फडणवीस विरोधी पक्षाचं हसं करत आहेत अशी जोरदार टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली आहे. परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली. परमबीर सिंह यांच्या पत्रात संशय घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. इतर कोणी पत्र लिहून दिले आणि परमबीर सिंग यांनी त्यावर फक्त सही केली का, अशी शंका संजय राऊत यांनी बोलून दाखवली आहे. संजय राऊत आज दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यानंतर आता भाजपाने संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

BJP Pravin Darekar And Shivsena Sanjay Raut Over Anil Deshmukh 

अनिल देशमुखांवरून भाजपाने राऊतांना टोला लगावला आहे. "संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्य करत आहेत" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्य करत आहेत. शिवसेना नेत्यांची पाठराखण करायला विसरलेले राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण अत्यंत इमानाने करताना दिसताहेत" असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. 

"संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी केलेलं कृत्य अयोग्यच आहे. मात्र, शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. बंजारा समाज शिवसेनेच्या पाठीशी उभा केला. या नेत्याची पाठराखण संजय राऊत यांनी केली नाही. राठोड यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची गरज नाही असं राऊत कधी बोलले नाहीत. आपल्याच नेत्याला विसरलेले राऊत आता अनिल देशमुख यांची पाठराख इमानेइतबारे करत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत म्हणून अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही असा निर्वाळा देताना संजय राऊत या ठिकाणी दिसून येत आहेत" अस दरेकर यांनी म्हटलं आहे. 

ठाकरे सरकारचा बेधुंद कारभार, सर्व स्तरावर अराजकता; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांनी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊन, राष्ट्रपतींपर्यंत त्याचा रिपोर्ट पोहोचवावा. केवळ भाजपाचीच मागणी आहे म्हणून नाही. तर, राज्यात सर्वस्तरावर अराजकता पसरलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक सरकारं झाली, पण इतका बेधुंद कारभार आणि अशाप्रकारची चर्चा व गोष्टी या अगोदर कधीच झाल्या नाहीत, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरPoliticsराजकारणAnil Deshmukhअनिल देशमुखMaharashtraमहाराष्ट्रSanjay Rathodसंजय राठोड