शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"मुंबई महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना"; भाजपाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 17:11 IST

BJP Pravin Darekar Slams BMC : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयूमधील एका रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयाला भेट दिली. खबरदारी घेतल्यानंतरही घडलेला हा प्रकार गंभीर आहे. रुग्णावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश महापालिका प्रशासनास दिल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले. याच दरम्यान भाजपाने मुंबई महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे. "मुंबई महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना" असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने एका रुग्णाचे डोळे कुरतडले असल्याचा प्रकार धक्कादायक आहे. आज त्या रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली. मुंबई महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे" असं दरेकरांनी म्हटलं  आहे. तसेच "मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, महापौरांना लक्ष द्यायला वेळ मिळेना! इथे सगळेच 'राम भरोसे'. राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळा कुरतडलेल्या रुग्णाची भेट घेऊन विचारपूस केली. महापालिकेच्या माध्यमातून मुंबईला कुरतडणाऱ्या अशा उंदरांचा लवकरच बंदोबस्त करावा लागणार आहे" असं देखील दरेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

दरेकर यांनी रूग्णालाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. "डॉक्टरांनी आपल्यापरीने महापालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी 100 टक्के शरमने मान खाली मुंबईकरांना घालावी लागेल, किंबहुना महापालिकेला अशा प्रकारची भयानक गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. असाच प्रकार सायन हॉस्पिटलमध्ये यापूर्वी देखील घडला होता. जर महापालिका कोरोना काळात सर्वोत्तम म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे आणि अशावेळी उंदीर जर एखाद्या आयसीयूमधील रूग्णाचे डोळे कुरतडत असेल, तर यापेक्षा गंभीर दुसरी बाब असू शकत नाही. मनपाच्या नियमांनुसार तिथं सॅनिटायझेशनची आवश्यकता असते, जर व्यवस्थित सॅनिटायझेशन झालेलं असतं, तर तिथं उंदीर येऊ शकला नसता. याचा अर्थ सॅनिटायझेशन करणारी यंत्रणा कमी पडली का? मग ते संबंधित अधिकारी कुठं आहेत? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे" असं म्हटलं आहे. 

"केवळ चौकशी झाली, अहवाल आला आणि तो बासनात गुंडाळून ठेवला, असा प्रकार होता कामा नये. लोकं आता घाबरले आहेत, सायन हॉस्पिटलला या अगोदर असा प्रकार झालेला असुनही तुम्ही सुधारला नाहीत. आता राजावाडी रूग्णालयात घडला आहे. मी या प्रकाराबद्दल अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहे" असं देखील प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. श्रीनिवास यल्लपा या 24 वर्षीय रुग्णाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि यकृतासंबंधी समस्या होती. मंगळवारी सकाळी त्याच्या नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यांनी डोळे तपासले असता डोळ्याला उंदराने कुरतडल्याचे समोर आले. त्यांनी परिचारिकांना सांगितले. मात्र, त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. आयसीयू तळमजल्यावर असल्याने येथे उंदरांचा वावर आहे. प्रथमदर्शनी उंदराने चावा घेतल्याचे दिसत असून याबाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरMumbaiमुंबईPoliticsराजकारणhospitalहॉस्पिटलBJPभाजपा