शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

‘सरकार’ आहे की ‘सर्कस’? तुमच्या कोलांट उड्यांना जनता त्रासलीय; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 15:55 IST

राज्य सरकारने शाळा सुरु होण्याच्या जीआरला स्थगिती दिली आहे. यावरून आता भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, ‘सरकार’ आहे की ‘सर्कस’, अशी खोचक टीका केली आहे.

मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी याची घोषणा केली होती. मात्र टास्क फोर्सच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला. टास्क फोर्सने शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता. मात्र, राज्य सरकारने शाळा सुरु होण्याच्या जीआरला स्थगिती दिली आहे. यावरून आता भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, ‘सरकार’ आहे की ‘सर्कस’, अशी खोचक टीका केली आहे. (bjp pravin darekar criticised thackeray govt over stay on education dept decision) 

भन्नाट योजना! पुढील ३ महिन्यांत हायवेवरील टोलनाके बंद होणार?; नितीन गडकरींचा ‘मेगा प्लान’

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी शाळा सुरू होण्याबाबत आक्षेप घेतला होता. शाळा सुरू झाल्यावर कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती मंत्र्यांनी व्यक्त केली होती. मात्र शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यावर भर दिला. त्यानंतर आता राज्य सरकारने शिक्षण विभागाच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आता १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाहीत. यावर भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडले आहे. 

महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? नितीन गडकरींचे सूचक उत्तर

तुमच्या कोलांट उड्यांना जनता त्रासलीय

'सरकार' आहे की, 'सर्कस'? १५ टक्के शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला? जनता त्रासलीय तुमच्या या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना! एक काय तो ठाम निर्णय घ्या अन्यथा जन उद्रेक होईल! पालक आणि विद्यार्थी, तुमच्या या टोलवाटोलवीच्या धोरणामुळे त्रस्त झाले आहेत. जनतेची दिशाभूल करु नका, ठोस निर्णय घ्या, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री घोषित करतात. काल टास्क फोर्स निर्णयाला आक्षेप घेते. निर्णय घेण्यापूर्वीच टास्क फोर्सचा सल्ला का घेतला नाही, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 

शिक्षणाचा खेळखंडोबा करु नका

मुंबईत रात्री १० पर्यंत बार आणि मॉल सुरु झालेले चालतात, शिष्यवृत्तीच्या परिक्षेसाठी फक्त कोरोना आडवा येतो का? पालक आणि विद्यार्थी, तुमच्या या 'धोरण लकव्या'मुळे त्रस्त झाले आहेत. शिक्षणाचा खेळखंडोबा करु नका. मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांचा आदेश, मुंबईतही शिष्यवृत्तीची परीक्षा घ्या. महानगरपालिकेचा उलटा आदेश, परीक्षा होऊ देणार नाही. राज्यभरातील ७ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देतील. मात्र,राज्य सरकारच्या 'धोरण लकव्या'मुळे मुंबईतील विद्यार्थ्यांची संधी हुकेल, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. 

“देशात सध्या वैचारिक दहशतवाद, देश तोडण्याचा काही जण प्रयत्न करतायेत”: बाबा रामदेव

दरम्यान, ग्रामीण भागात पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती. प्रत्येक वर्गात कमाल २० विद्यार्थ्यांनाच परवानगी दिली होती. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रांत होतील, असे सांगितले होते. शाळा सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केल्या होत्या. चौथीपर्यंतच्या शाळा मात्र बंद राहतील. ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग आधीपासूनच सुरू आहेत.  

टॅग्स :Educationशिक्षणVarsha Gaikwadवर्षा गायकवाडBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस