महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? नितीन गडकरींचे सूचक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:27 PM2021-08-12T12:27:24+5:302021-08-12T12:28:11+5:30

देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातील एकही नेता पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकला नाही. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना विचारणा करण्यात आली.

nitin gadkari big statement on why has no leader become prime minister from maharashtra till date | महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? नितीन गडकरींचे सूचक उत्तर

महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? नितीन गडकरींचे सूचक उत्तर

Next

मुंबई: देशभरात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळातील चर्चा सुरू आहे. त्यातच आता पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाच्या विषयावरून चर्चा रंगताना दिसत आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातील एकही नेता पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकला नाही. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना विचारणा करण्यात आली. यावर उत्तर देताना गडकरींनी सूचक विधान केले आहे. (nitin gadkari big statement on why has no leader become prime minister from maharashtra till date)

आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहोत. पण पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राचा एखादा नेता, देशाचा पंतप्रधान का झाला नाही, असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. यावर, महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंथ आणि राज्य कोणतेही असो. एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल, तर तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल, असे स्पष्ट मत नितीन गडकरी यांनी मांडले. 

भन्नाट योजना! पुढील ३ महिन्यांत हायवेवरील टोलनाके बंद होणार?; नितीन गडकरींचा ‘मेगा प्लान’

मुंबई-पुण्यातील ट्रॅफिक ५० टक्क्यांनी कमी होणार

सूरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर आणि अहमदनगरहून सोलापूर, असा नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील ट्रॅफिक ५० टक्के कमी होणार आहे. तसेच मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेमुळे आपण प्रदूषण कमी करु. इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी यांचा वापर करण्याची गरज आहे. पुण्यात ऑटो रिक्षा, स्कूटर या ताबडतोब इथेनॉलवर चालवाव्यात, असा माझा सातत्याने आग्रह आहे. पंतप्रधानांनी दोन पेट्रोल पंपांचे उद्घाटनही केले आहे. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला, तर कोरोनाच्या काळातही ग्रोथ रेट वाढण्यास मदत होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.

भन्नाट संधी! Amul ची फ्रेंचायझी घ्या अन् २ लाखांच्या गुंतवणुकीवर १० लाखांचा नफा मिळवा

दरम्यान, पायाभूत सुविधांचा विकास हा देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि महामार्ग बांधकामात प्रतिदिन १०० किमी एवढा वेग गाठणे हे आपले लक्ष्य आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही एका दिवसात ३८ किमी रस्ता बनवून विश्वविक्रम केला. मी सध्याच्या कामगिरीवर समाधानी नाही. माझे लक्ष रोज १०० किलोमीटर महामार्ग बांधणीचे आहे. एवढेच नाही, तर सरकारचा प्रयत्न कालबद्ध, लक्ष्य केंद्रित, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आहे, असेही गडकरी म्हणाले.
 

Read in English

Web Title: nitin gadkari big statement on why has no leader become prime minister from maharashtra till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.