शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अजून किती दिवस तुम्हाला मराठा स्ट्राँग मॅन उपमा द्यायची?; उदयराजेंचा पवारांवर वार

By कुणाल गवाणकर | Published: November 29, 2020 1:13 PM

मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

सातारा: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. वर्षानुवर्षे मराठा समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे इतकी वर्षे सत्तेत असलेल्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत. अजून किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार, असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षण प्रश्नावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. 'मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे सत्तेत असलेले या प्रश्नाला जबाबदार आहेत. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्यांनी आता समाजाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना आरक्षणाचा मुद्दा रेटून नेला. मग तुम्हाला का जमत नाही?,' असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.मराठा आरक्षणाचा विषय काहींना अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. पण किती दिवस मराठ्यांचे कैवारी, मराठा स्ट्राँग मॅन उपमा किती दिवस द्यायची?, असा प्रश्न उपस्थित करत उदयनराजेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तुम्ही शरद पवारांची भेट घेऊन चर्चा करणार का, असा प्रश्न यावेळी उदयनराजेंना विचारण्यात आला. त्यावर नुसती चर्चा करून काय उपयोग? तोडगा निघणार असेल, तर चर्चा करण्यात अर्थ आहे, असं उत्तर उदयनराजेंनी दिलं.गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेले नेते आजही सत्तेत आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा. मराठा समाजामध्ये मोठी नाराजी आहे. सध्या कोरोनाचं संकट आहे. अन्यथा मराठा समाज सरकारमधील नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक निवडणुकीत आरक्षणाचं आश्वासन दिलं जातं. पण प्रश्न मार्गी लागत नाही. राज्यात मराठा ही निर्णायक जात आहे. विश्वासघात झाल्यास सरकारला जनताच खाली खेचेल. ऍक्शनला रिऍक्शनला मिळाल्यास जबाबदारी सरकारची असे, अशी आक्रमक भूमिका उदयनराजेंनी घेतली. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षण