शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना नारायण राणेंचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 2:31 PM

BJP MP Narayan Rane : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासह राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणाने राज्याच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

मुंबई : सचिन वाझे प्रकरणाने राज्याच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावरून राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली असताना आता भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासह राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. (BJP MP Narayan Rane : person like Mukesh Ambani is unsafe in Mumbai, I've written to HM Amit Shah for CM's resignation & President's Rule in state)

यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. "महाराष्ट्र सरकार योग्यरित्या काम करत नाही. सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जाते, मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. तसेच, राज्यातील भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे", असे नारायण राणे यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी आणि गाडीचा मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्याने त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. या घडामोडींनंतर विरोधीपक्ष भाजपाने अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून या बदल्या पुरेशा नसल्याचे म्हणत यामागे असणाऱ्या राजकीय शक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

("हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत")

'राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे'दोन दिवसांपूर्वी भाजपाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत तर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्ले चढवले. केवळ पोलीस आयुक्तांची बदली करून चालणार नाही तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली तर या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पाटील यांनी केली. त्यापाठोपाठ आता नारायण राणे यांनीही  थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रsachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहा