"हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:02 PM2021-03-18T17:02:09+5:302021-03-18T17:03:38+5:30

bjp criticized thackeray government : भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या देखील राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

bjp criticized thackeray government and demands resignation of home minister anil deshmukh | "हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत"

"हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत"

googlenewsNext
ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका होत होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे.

मुंबई : सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) यांची काल उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका होत होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून भाजपाने राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. (bjp criticized thackeray government and demands resignation of home minister anil deshmukh)

"जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामं करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं आणि अनेक प्रकरणं दाबण्याचं पाप या सरकारकडून केलं जातंय!" असे ट्विट भाजपाकडून करण्यात आले आहे.

याचबरोबर, भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या देखील राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपाने प्रश्नांचा भडीमार केला आहे. "वाझेंची नेमणूक चालवून घेतलीत, आता त्यांना सॅल्यूटही ठोका हा आदेश मानणार नाही सांगितल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली का?, हिरेन यांच्याबाबत बातम्या आल्यानंतरही वाझेंवर काहीच कारवाई झाली नाही. NIA चौकशी सुरू होईपर्यंत वाझेंना सांभाळून घेण्याचे आदेशच होते का?, इतके भयंकर कट रचणाऱ्याच्यांच हाती तपास… चोराच्या हातीच चाव्या देण्याइतके मजबूर का झालात गृहमंत्री?, असे प्रश्न भाजपाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारण्यात आले आहेत.

'सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे' 
राजकीय आशीर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
याचबरोबर सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने, आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला, तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

("...या भ्रमात कोणीच राहू नये", परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर संजय राऊतांचा विरोधकांना इशारा)

Web Title: bjp criticized thackeray government and demands resignation of home minister anil deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.