शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

"काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर भाजपत यावं," खासदाराची सचिन पायलट यांना ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 13:21 IST

Sachin Pilot : भाजपमध्ये मोकळा श्वास घेण्याची संधी मिळेल, असंही भाजप खासदार म्हणाले.

ठळक मुद्देभाजपमध्ये मोकळा श्वास घेण्याची संधी मिळेल, असंही भाजप खासदार म्हणाले.पायलट यांना त्यांच्या हक्काच्या सर्व गोष्टी मिळतील, भाजप खासदाराचं वक्तव्य

सचिन पायलट यांनी काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं आणि मोकळा श्वास घ्यावा अशी ऑफर भाजपचे राज्यसभेचे खासदार किरोडीलाल मीणा यांनी दिली. दौसा येथे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं. "सचिन पायलट यांनी संयम राखला पाहिजे. त्यांनी संयम राखला तर पायलट यांना त्यांच्या हक्काच्या सर्व गोष्टी मिळतील," असं मीणा म्हणाले. "जर पायलट यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं भाजपमध्ये मोकळा श्वास घेण्याची संधी मिळेल. त्यांच्या हक्काच्या सर्व गोष्टी त्यांना मिळतील," असं मीणा यांनी बोलताना स्पष्ट केलं. "काँग्रेसनं पायलट यांना लाईनमध्ये उभं केलं आहे. ते एक ऊर्जावान नेते आहेत. काँग्रसमध्ये एकमेकांची खेचाखेची अधिक आहे. काँग्रेसची ही लढाई राजस्थानसाठीही घातक आहे. राज्याचा विकासच होत नाहीये," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं उदाहरण दिलं. त्यांनी १९८८ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. परंतु ते आता राष्ट्राध्यक्ष झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. वसुंधरा राजे यांच्यावरही भाष्यकिरोडीलाल मीणा यांनी यावेळी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरही भाष्य केलं. "वसुंधरा राजे या जनाधार असलेल्या नेत्या आहेत. त्यांना बाजूला करण्याचा कोणताही प्रश्नच येत नाही. ना त्या पक्षातून बाहेर जाण्याचा विचार करत आहेत. वसुंधरा राजे यांच्याबद्दल माध्यमांमध्ये वृत्त येत आहे. परंतु ते दुर्देवी आहे," असंही मीणा म्हणाले. वसुंधरा राजे या जनाधार असलेल्या नेत्या आहे. त्यांच्याव्यतिरिक्तही पक्षात अनेक नेते आहेत. त्या पार्टीलाईनवर चालतील आणि ते कधीही तोडणार नाहीत अशी अपेक्षा आपण करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यापूर्वी राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरून किरोडीमल मीणा यांनी आपला पक्ष स्थापन केला होता. परंतु कालांतरानं ते पुन्हा भाजपमध्ये आले. वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदी होत्या त्यावेळी त्यांना राज्यसभेचं खासदार बनवण्यात आलं होतं. 

टॅग्स :congressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाRajasthanराजस्थान