शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
4
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
5
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
6
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
7
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
8
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
9
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
10
शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
11
"रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यासाठीच ब्राँको टेस्ट आणलीये..."; माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप
12
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
13
अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
14
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
15
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
16
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
17
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
19
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
20
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न

बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 09:06 IST

बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा वापर होत असेल याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे असं होत नाही. ज्यारितीने लोक बॉलिवूडला निशाणा बनवत आहेत ते चुकीचं आहे, योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देबॉलिवूडमध्ये कोणी ड्रग्सचा वापर करत असेल याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे असं होत नाहीज्यारितीने लोक बॉलिवूडला निशाणा बनवत आहेत ते चुकीचं आहेजया बच्चन यांच्यापाठोपाठ भाजपा खासदार हेमा मालिनी बॉलिवूडसाठी पुढे आली.

नवी दिल्ली – अभिनेता आणि भाजपा खासदार रवी किशनने लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात बॉलिवूड आणि ड्रग्स तस्करी हा मुद्दा उचलून धरला. यावर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी विरोध करत राज्यसभेत यावर भाष्य केलं. काही लोक बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहेत असा आरोप करत ज्या ताटात जेवायचं त्यालाच छिद्र करायचं हे चुकीचं आहे अस म्हणत फटकारलं होतं.

आता अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी जया बच्चन यांचं समर्थन केलं आहे. एका न्यूज चॅनेलशी बोलताना त्या म्हणाल्या की, फक्त बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येच ड्रग्सचा वापर होतो हे कसं बोलता? जगात अनेक क्षेत्र आहेत ज्याठिकाणी ड्रग्स वापरलं जातं. बॉलिवूडमध्ये कोणी ड्रग्सचा वापर करत असेल याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे असं होत नाही. ज्यारितीने लोक बॉलिवूडला निशाणा बनवत आहेत ते चुकीचं आहे, योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेकडूनही जया बच्चन यांचे समर्थन

हिंदी सिनेसृष्टीने जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केलेला आहे. हॉलिवूडच्या बरोबरीने बॉलिवूडचे नाव घेतले जाते. पण उद्योगात जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती, अझिम प्रेमजी आहेत. तसे नीवर मोदी, माल्या आहेत. तसेच सिनेसृष्टीच्याबाबतीतही म्हणावे लागेल. सब घोडे बारा टके, असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा आपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणलीय. त्यातून आथा किती कलाकारांना कंठ फुटतो ते पाहू, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

भारतातील सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे, अशा दावा कुणीही करणार नाही. मात्र काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस गटारही म्हणता येणार नाही. जया बच्चन यांनी संसदेत नेमकी तीच भावना बोलून दाखवली आहे. त्यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आणि परखड आहे. चित्रपटसृष्टीची बदनामी सुरू असताना भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प बसले आहेत. पडद्यावर शूर लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळवणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलुपबंद होऊन पडले आहेत, अशा परिस्थितीत जया बच्चन यांनी आवाज उठवला आहे.

रवी किशन यांनी लोकसभेत उचलला होता मुद्दा

गोरखपूर येथील भाजपा खासदार रवी किशन यांनी बॉलिवूड आणि ड्रग्स तस्करी यांचा मुद्दा लोकसभेत उचलला. ते म्हणाले की, भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्स मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अनेक लोकांना यात पकडलं आहे. एनसीबी खूप चांगले काम करत आहे. मी केंद्र सरकारला आवाहन करतो की, त्यांनी या लोकांना कठोर कारवाई करावी. दोषींना लवकरात लवकर पकडून कडक शिक्षा द्यावी ज्यामुळे शेजारील राष्ट्रांचा डाव संपुष्टात येईल. रवी किशन हे अभिनेते व उत्तर प्रदेशातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

चित्रपटसृष्टीला समाजमाध्यमांतून फटकारले जात आहे, कारण सरकारचा या मनोरंजन क्षेत्राला पाठिंबा नाही, असं सांगून जया बच्चन म्हणाल्या, काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण चित्रपटसृष्टीला कलंक लावू शकत नाहीत. रवी किशन यांचे वक्तव्य हे सध्या देशाची बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारी या विषयावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी आहे, असा आरोपही बच्चन यांनी केला.

तसेच या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असं जया बच्चन म्हणाल्या.  त्याचसोबत सरकारने मनोरंजन क्षेत्राला मदत केली पाहिजे. काही वाईट लोकांमुळे आपण संपूर्ण बॉलिवूडची प्रतिमा खराब करू शकत नाही. सोमवारी लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. जे स्वतः बॉलिवूड इंडस्ट्रीतील आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात जेवतो त्यालाच छिद्र करतो हे चुकीचे आहे. उद्योगाला शासनाची साथ गरजेची असते असंही त्या म्हणाल्या होत्या.

कंगना काय म्हणाली?

याबाबत कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ''जया जी, तुम्ही तेव्हाही असंच बोलला असतात का जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला टीएनेजमध्ये मारहाण झाली असती, ड्रग्स दिलं गेले असतं आणि छेडछाड केली असती? तुम्ही त्यावेळीही हे बोलला असतात का जेव्हा अभिषेक बच्चनला त्रास दिला जात असता आणि एके दिवशी तो फासावर लटकलेला दिसला असता? आमच्याबद्दलही सहानुभूती दाखवा.''

टॅग्स :Hema Maliniहेमा मालिनीbollywoodबॉलिवूडlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाJaya Bachchanजया बच्चनDrugsअमली पदार्थKangana Ranautकंगना राणौत