शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

"मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का?", भाजपाचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 17:44 IST

BJP Maharashtra Slams Sanjay Rathod And Thackeray Government : राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार? सत्य जनतेला कधी कळणार?" असं म्हणत भाजपाने निशाणा साधाला आहे. 

भाजपा महाराष्ट्रने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राठोड आणि ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. तसेच विविध सवाल देखील उपस्थित करण्यात आले आहेत. "काल संजय राठोड यांनी राजीनामा दिला खरा पण आता ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? ठाकरे सरकार त्यांची चौकशी कधी करणार? आणि चौकशीत राठोड हे दोषी आढळले तर त्यांच्यावर निष्पक्षपातीपणाने कारवाई होणार का? हे खरे प्रश्न आहेत" असं भाजपाने म्हटलं आहे. 

"पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार?, सत्य जनतेला कधी कळणार?"

"मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय?, बराच गदारोळ माजल्यानंतर शिवसेनेने संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. पण आता आमदारकीचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का?" असा सवाल भाजपाने विचारला आहे. तसेच "पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार? सत्य जनतेला कधी कळणार?" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे.  फक्त राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. 

"फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा"

"फक्त संजय राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करावीच लागेल. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की आत्महत्या झाली हे समजेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली?. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सखोल चौकशी केली जात आहे असं सांगितलं जात होतं. पण कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करत होते? कुणाची चौकशी करत होते?" असा सवाल शेलार यांनी केला आहे. 

 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा