शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसवर भाजपचा पलटवार; कोरोनावरून पंतप्रधान मोदींची बदनामी करण्याचा प्रयत्न : संबित पात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:55 IST

संबित पात्रा यांनी दाखवलं काँग्रेसची कथित टूलकिट. काँग्रेस धर्माच्या आधारे राजकारण करत असल्याचा पात्रा यांचा आरोप.

ठळक मुद्देसंबित पात्रा यांनी दाखवलं काँग्रेसची कथित टूलकिट.काँग्रेस धर्माच्या आधारे राजकारण करत असल्याचा पात्रा यांचा आरोप.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरु असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनमी माध्यमांशी संवाद साधताना कांग्रेसची एक कथिट टूलकिट दाखवली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणायचं आहे. कुंभला सुपर स्प्रेडरप्रमाणे सांगायचं आहे. परंतु ईदला काहीच म्हणायचं नाही," असं पात्रा यांनी कथित टूलकिट दाखवताना म्हटलं. "ज्यावेळी इंडियन स्ट्रेनचा उल्लेख होईल त्यावेळी त्याला सोशल मीडिया वॉलेंटियर्सनं मोदी शब्दाचा वापर करावा. जो नवा स्ट्रेन आला आहे त्याला इंडियन स्ट्रेन असा उल्लेख करू नये असं म्हटलं आहे. त्याच्या वैज्ञानिक नावाचा उल्लख करावा. परंतु काँग्रेस कुठे ना कुठे जागतिक आरोग्य संघटनेच्या विरोधात जाऊन त्याला इंडियन स्ट्रेन असं म्हणण्यास सांगितलं आणि त्यापेक्षाही पुझे त्याला मोदी स्ट्रेन असा उल्लेख करण्यास सांगितलं," असं पात्रा म्हणाले. ही अतिशय खेदजनक बाब आहे आणि जगात भारताचा अपमान करण्यासाठी विषाणूच्या स्ट्रेनला भारताच्या नावावर, पंतप्रधानांच्या नावे बोलावण्याचे चेष्टा करण्यात आली आहे. हे काँग्रेसचं खरं रुप दाखवत आहे," असंही ते म्हणाले. राहुल, सोनिया गांधींवरही निशाणायावेळी संबित पात्रा यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. "जे रोज सकाळी उठून राहुल गांधी जे ट्वीट करत होते आज ती कागदपत्रे माझ्या हाती आली आहेत, ज्याच्या माध्यमातून ते ट्वीट करत होते. यामध्ये मिसिंग अमित शाह, क्वारंटाईन जयशंकर, साईडलाईन राजनाथ सिंग, इनसेन्टिव्ह निर्मला सीतारामन अशा अनेक शब्दांचा वापर करण्यात आलं आहे. काही मासिकांत मिसिंग गव्हर्नंन्स, मिसिंग गव्हर्मेंट अशाप्रकारचे फोटो छापा आणि अखेर मोदींना सारखं सारखं पत्र लिहा असंही लिहिण्यात आलं आहे," पात्रा म्हणाले. या कागदपत्रांमध्ये लिहिलंय आम्हाला पीएम केयर्स बाबत अनेक प्रश्न उपस्थित करायचे आहेत. वेंटिलेटर्सची बदनामी करायची आहे.  सेंट्रेल विस्तावर प्रश्न उपस्थित करायचे आहेत, त्याला मोदी महल असं नाव द्यायचंय. दररोज मी कोणत्याही चर्चासत्राला जातो तेव्हा काँग्रेसचे प्रवक्ते त्याला मोदी महल म्हणतात आणि कागदपत्रांमध्येही तेच लिहिल्याचं ते म्हणाले.

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद