सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 09:51 IST2021-02-20T09:48:47+5:302021-02-20T09:51:00+5:30

Prasad Lad On Nana Patole : नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय, असं म्हणत लाड यांनी साधला निशाणा

bjp leader prasad lad criticize congress leader nana patole celebration after home isolation | सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका

सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका

ठळक मुद्देनानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय, लाड यांनी साधला निषाणानानांच्या नाना तऱ्हा. सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, लाड यांचं वक्तव्य

आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानं आपण काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. दरम्यान, शुक्रवारी नाना पटोले यांनी जुहू येथील एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यारून भाजप नेते प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. " नानांच्या नाना तऱ्हा. सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन," असं म्हणत लाड यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला.

"नानांच्या नाना तऱ्हा!! सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन! हाच आहे काँग्रेसचा तमाशा. स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना १४४ कलम लाऊन अटक करायचं. नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय. महाआघाडी हेच का अजब तुझे सरकार..," असं म्हणत प्रसाद लाड यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पटोले यांच्यावर बोचरी टीका केली.



मुंबईत कोरोनाबाधित वाढले

आठवड्याभरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी ५२५ दिवसांवरुन शुक्रवारी ३९३ दिवसांवर आला आहे. शुक्रवारी दिवसभरात गेल्या महिन्याभराच्या तुलनेत सर्वाधिक ८२३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या ६५७७ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याने महापालिकेने १ फेब्रुवारीपासून मुंबईतील रेल्वे सेवा ठराविक वेळेत सर्वांसाठी सुरू करण्यात आली. त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी वाढल्याने गेल्या दोन आठवड्यांत रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. १२ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५२५ दिवसांचा होता. मात्र एकाच आठवड्यात यात १३२ दिवसांची घट झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूच्या आकडा कमी राखण्यात पालिकेला यश आले आहे. शुक्रवारी ४४० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष आणि एक महिला रुग्णाचा समावेश होता.

Web Title: bjp leader prasad lad criticize congress leader nana patole celebration after home isolation