चार खासदार असलेल्या पक्षाच्या अध्यक्षांना लोकनेते म्हणता, मग...; पडळकरांची पवारांवर टीका
By कुणाल गवाणकर | Updated: November 23, 2020 15:21 IST2020-11-23T15:13:31+5:302020-11-23T15:21:00+5:30
राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर सरसावले

चार खासदार असलेल्या पक्षाच्या अध्यक्षांना लोकनेते म्हणता, मग...; पडळकरांची पवारांवर टीका
सांगली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांवर शरसंधान साधलं आहे. ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता. मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढासळलेले - हसन मुश्रीफ
तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असा प्रश्न गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला आहे. सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
...तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांनी सांगितली महत्त्वाची अट
गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं. आपण कोणावर टीका करतोय याचा अभ्यास चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी करायला हवा. त्यांनी शरद पवारांचं कर्तृत्व पाहायला हवं. वयाच्या ३६ व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले. गेल्या ५० वर्षांपासून ते संसदीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे टीकाकारांनी एकदा स्वत:ला पवारांसमोर तपासून पाहायला हवं, असं परब म्हणाले. पडळकर यांच्यावर भाजपचे संस्कार नाहीत. भाजपमधील व्यक्ती अशी बोलणार नाहीत. हा भाजपमधील भेसळीचा परिणाम आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मला चंपा आणि फडणवीसांना टरबूज म्हणता त्याचं काय? चंद्रकांत पाटलांचा सवाल
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी एका मेळाव्यात केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असंदेखील पाटील म्हणाले होते. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच तोफ डागली होती.