शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

"संजय राऊतांच्या केवळ पोकळ गप्पा, पुरावे द्या मोकळे व्हा", भाजपचे भातखळकर गरजले

By मोरेश्वर येरम | Published: December 28, 2020 5:21 PM

"संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण...केवळ तोंडाच्या वाफा, पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला?"

ठळक मुद्देसंजय राऊत यांच्या आरोपांना अतुल भातखळकरांनी दिलं प्रत्युत्तर कर नाही त्याला डर कशाला?, भातखळकरांनी दिला राऊतांना खोचक सल्लासंजय राऊत यांची विधानं वैफल्यग्रस्ततेतून आल्याचं भातखळकर म्हणाले

मुंबईशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. यापार्श्वभूमीवर राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. राऊतांच्या टीकेला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण...केवळ तोंडाच्या वाफा, पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला?", असा हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी केला आहे. 

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या कार्यकर्त्यांचा माकड म्हणून उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरही भातखळकर संतापले. "संजय राऊत आपल्या सवंग राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन करत आहेत. चांगले आहे लोकांना शिवसेनेची औकात कळते आहे", असं भातखळकर म्हणाले. 

भातखळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओही ट्विट केला आहे. "संजय राऊत यांनी आज वैफल्यग्रस्ततेने सवंगपद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडलं तर केंद्राला हादरे बसतील असं ते म्हणाले, पण तुमचं तोंड दाबलंय कुणी? उघडा ना तोंड. जे मनात येईल ते बोला. तुमच्या बोलण्याने कुणाला फरक पडणार नाही. कर नाही त्याला डर असण्याचं कारण नाही. थेट पुरावे द्या. ईडीच्या नोटीशीला उत्तर द्या. भाजपवर आरोप करण्याचे उद्योग थांबवा. कंपाऊंडरकडून औषध घेता आता एमडी डॉक्टरकडून घ्या म्हणजे तुमची मनस्थिती थोडी ठिक होईल", असं भातखळकर म्हणाले. 

संजय राऊत यांनी केला जोरदार हल्लाबोलखासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. भाजपच्या या हस्तकांनी मला २२ आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावे होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगण्यात आले आहे, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv Senaशिवसेना