शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 3:17 PM

Rakesh Tikait : भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली होती. 

ठळक मुद्देभाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली होती. शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना मतं न देण्याचं टिकैत यांचं आवाहन

"श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपचा श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही," अशी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली होती. दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता हळूहळू देशव्यापी करण्याचा निर्धारही भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या प्रभू श्रीरामावरील वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. "भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही ही शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची राजकीय टीका म्हणजे राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही. हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे हे सिद्ध करते," असं म्हणत भातखळकर यांनी टिकैत यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टिकैत यांच्यावर टीका केली.काय म्हणाले होते टिकैत?"श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपचा श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही. भाजपवाल्यांनी महात्मा गांधी आणि रामभक्त हनुमान यांनाही आंदोलनजीवी करून टाकले आहे. ते आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर माफी मागायला हवी," अशी मागणी राकेश टिकैत यांनी यावेळी केली. "वास्तविक पाहता हनुमंतांचा लंकेशी काही वाद नव्हता. मात्र, प्रभू श्रीरामांना मदत करण्यासाठी ते लंकेत गेले. भाजपवाल्यांचा श्रीरामांशी काही संबंध नाही. त्यांना श्रीरामचंद्रांशी काही घेणे देणे नाही," असा दावा राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. पश्चिम बंगालमध्ये किसान पंचायत"केंद्रीय कृषी कायद्यामुळे सामान्य जनता नाही, तर पशूंचाही भूकबळी जाईल. पश्चिम बंगालमधील शेतकरी दुःखी आहेत. त्यांना त्यांच्या पीकाची योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे तेथेही किसान पंचायतीचे आयोजन केले जाईल," असं राकेश टिकैत यांनी जाहीर केलं. शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना मतं देऊ नका, असं आवाहन करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरTwitterट्विटर