“दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार की अजूनही वर्क फ्रॉम?”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 02:37 PM2021-08-10T14:37:06+5:302021-08-10T14:42:42+5:30

ठाकरे सरकारने लोकल प्रवाससचा प्रश्न अवघड करून ठेवला आहे, अशी टीका केल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

bjp keshav upadhye taunts cm uddhav thackeray about doing work from home | “दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार की अजूनही वर्क फ्रॉम?”

“दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार की अजूनही वर्क फ्रॉम?”

googlenewsNext
ठळक मुद्देदोन डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार का?स्वत:च मर्सिडीझ चालवत असल्याने बारकोड स्कॅनिंगचाही अडथळा नाहीभाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून साधला निशाणा

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यासाठी ठाकरे सरकारवर भाजप तसेच जनतेचा रेटा सुरू होता. यानंतर ठाकरे सरकारने सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टनंतर लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देत असल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, यासाठी काही अटी सरकारने ठेवल्या आहेत, त्या पूर्ण केल्यानंतर लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र, ठाकरे सरकारने लोकल प्रवाससचा प्रश्न अवघड करून ठेवला आहे, अशी टीका केल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार का, अशी विचारणा केली आहे. (bjp keshav upadhye taunts cm uddhav thackeray about doing work from home)

“हा टाइमपास कशाला?”; संसदेत प्रश्न विचारण्यावरुन राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन घेणाऱ्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. नागरिकांच्या रोषामुळे महाविकास आघाडी सरकार नमले. भाजपच्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली, अशी टीका केल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

PM मोदींची UNSC मध्ये पंचसुत्री; रशियाने मानले भारताचे आभार, व्लादिमीर पुतिन म्हणाले...

दोन डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार का?

दोन डोस घेतलेले सर्वसामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करतील पण दोन डोस झाले असतील तर मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का? गर्दी टाळण्यासाठी तसही तुम्ही स्वत:च मर्सिडीझ चालवत असल्याने बारकोड स्कॅनिंगचाही अडथळा नाही. दोन डोस झालेल्यांना जे नियम, ते स्वत:ही अमलात आणणार की अजूनही वर्क फ्रॉम होम करणार, असे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

कोर्टात याचिका करायची की आंदोलन हे ही सांगा

याआधी, आंदोलनं, याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरणं आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल १५ ऑगस्टला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो, आपलं अभिनंदन. आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या १५ ऑगस्टपासून सोडवाल यासाठी याचिका करू की आंदोलन? हेही सांगा, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला होता. 

आता बुलेट ट्रेनने अयोध्येला जाता येणार; दिल्ली-वाराणसी मार्गावर १२ स्थानके निश्चित!

दरम्यान, कोरोना काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे.  केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगितले.   
 

Web Title: bjp keshav upadhye taunts cm uddhav thackeray about doing work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.