“हा टाइमपास कशाला?”; संसदेत प्रश्न विचारण्यावरुन राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 01:31 PM2021-08-10T13:31:25+5:302021-08-10T13:32:47+5:30

माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत, हा टाइमपास कशाला, अशी विचारणा केली आहे.

bjp nilesh rane criticizes ncp supriya sule over question ask in parliament | “हा टाइमपास कशाला?”; संसदेत प्रश्न विचारण्यावरुन राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका 

“हा टाइमपास कशाला?”; संसदेत प्रश्न विचारण्यावरुन राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका 

Next

मुंबई: आताच्या घडीला संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव शिवसेनेवर व ठाकरे पिता-पुत्रांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करताना दिसतात. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राणे पिता-पुत्रांनी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही टीका सुरू केली आहे. यातच आता माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत, हा टाइमपास कशाला, अशी विचारणा केली आहे. (bjp nilesh rane criticizes ncp supriya sule over question ask in parliament)

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा द्यावा, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. हीच मागणी सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली. यावरून निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

“देवेंद्र फडणवीसांना कायद्याचे जास्त ज्ञान; त्यांचाही वकिली सल्ला घेऊ”; संजय राऊतांचा टोला

हा टाईमपास कशाला?

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये ३७७ अंतर्गत एम्पिरिकल डेटा (OBC) केंद्र सरकारने द्यावा ही मागणी केली. ३७७ अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देण्याची तरतूद नाही मग ह्या आयुदा अंतर्गत हा महत्त्वाचा प्रश्न विचारून काय होणार आहे? हा टाईमपास कशाला?, अशी विचारणा निलेश राणे यांनी केली आहे. 

दरम्यान, याआधीही निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले होते. अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे. पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे अर्थतज्ञ देखील सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवले. अर्थमंत्री असूनही त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले होते. तसेच साखर कारखानदारी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावरही निलेश राणेंनी टीका केली होती. रोहित पवार यांनी या टीकेला उत्तर दिल्यामुळे या दोन्ही युवा नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला महाराष्ट्राने पाहिला. 
 

Web Title: bjp nilesh rane criticizes ncp supriya sule over question ask in parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.