मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:04 PM2024-05-09T22:04:30+5:302024-05-09T22:06:34+5:30

Mumbai Lok Sabha Election 2024, BJP Shiv Sena, India vs Pakistan: १९९३च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इब्राहिम मुसा उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसल्याचा भाजपाचा दावा

BJP Amit Satam compares Mumbai Lok Sabha Election 2024 as India Pakistan War Amol Kirtikar Uddhav Thackeray | मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र

मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र

Mumbai Lok Sabha Election 2024, BJP Shiv Sena, India vs Pakistan: मुंबईत झालेल्या १९९३ मधील बॉम्बस्फोटचा आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे. मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचे समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहे. त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगचा लढा आहेच, परंतु ही लढाई आता भारत आणि पाकिस्तानची लढाई झालेली आहे, अशी टीका मुंबईतील भाजपा आमदार अमित साटम यांनी केली.

"उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की, ते नेमके कोणासोबत आहेत? ते मुंबईकरांसोबत आहेत की, १९९३ वेळी ज्यांनी मुंबईकरांना त्रास दिला त्यांच्यासोबत आहेत? असा सवालही आ. अमित साटम यांनी विचारला आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब खूपच संतापलेले होते आणि त्यांनी अत्यंत परखड भूमिका घेतली होती. पण तुम्ही आता १९९३  च्या बॉम्बस्फोटातील आरोपींनाच सोबत घेतलंय. तुम्हाला मुंबईकरांना नेमकं काय द्यायचंय?" असा प्रश्नही साटम यांनी उबाठा गटाला लक्ष्य करत विचारला.

Web Title: BJP Amit Satam compares Mumbai Lok Sabha Election 2024 as India Pakistan War Amol Kirtikar Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.