शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

"सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर आमच्याशी आहे गाठ"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 2:57 PM

BJP Atul Bhatkhalkar And Shivsena : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

मुंबई - अयोध्येतील राम मंदिर निर्माणात कथित जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेनेकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेने म्हटले आहे, की राम मंदिर निर्माणात काही घोटाळा झाला असेल, तर त्यात स्वतः पंतप्रधान मोदींनी लक्ष घालायला हवे. शिवसेनेने आपल्या मुखपत्र 'सामना'त मंगळवारी म्हटले आहे, की राम मंदिर कामाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिकपणे व्हायरल हवी. कारण ती एक राष्ट्रीय गौरवाची गोष्ट आहे. तत्पूर्वी, सोमवारी शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही ट्रस्टवर निशाणा साधला होता. भाजपानेही शिवसेनेवर पलटवार केला आहे.

भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर (Shivsena) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. "सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा" असं म्हणत निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम..." असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही" असं देखील याआधी अतुल भातखळकर यांनी म्हटलं होतं. भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) सणसणीत टोला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. "चेहरा भोळा अन् भानगडी सोळा" असं म्हणत कांजूरमार्ग कारशेडवरून शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे" असं म्हणत निशाणा साधला आहे. "मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने 3 हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी?" असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"चेहरा भोळा अन् भानगडी सोळा"; कांजूरमार्ग कारशेडवरून ठाकरे सरकारवर भाजपाचा गंभीर आरोप

"कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी  खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय! जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरू आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!" अशी जोरदार टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच "मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार? गेले चार महिने जपान सरकार निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला. वाढलेला 10 हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारला. श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे!" असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेस